छत्रपती संभाजीनगर: शिख धर्माचे पाचवे गुरू श्री गुरू अर्जुन शहीद दिवसानिमित्त क्रांतीचौक येथील झाशीची राणी पुतळ्यासमोर छबिला दिवस साजरा करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे नागरिकांना सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शिरा,चणा उसळ,लस्सी,पाणी वाटप करण्यात आले.याचा पाच हजार नागरिकांनी लाभ घेतला.यावेळी अध्यक्ष डाॅ.देवेंद्र खुराणा,सचिव रोहित मारिया,रोहित चोपडा,अरविंद बिंद्रा,समीर दुग्गल,कुलदिपसिंग निर्ह,मनीष कुकरेजा,जितेंद्र कक्कड,अखिल खन्ना,अजय अरोरा,राजेंद्र रखवाल,राजेंद्र रखवाला,निरज छत्रा,प्रमोद चोपडा आदी उपस्थित होते.
यावेळी अवतारसिंग मिन्हास,अमरजितसिंग छटवाल, जितेंद्र पाल,बलविरसिंग आदींनी परिश्रम घेतले.
पंजाबी कल्चर असोसिएशनच्यावतीने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.शहीद गुरू अर्जुन यांनी केलेल्या बलिदानास स्मरण करुन समाजसेवक अन्नदान,जलदानाचे पुण्य प्राप्त करतात-डाॅ.देवेंद्र खुराणा,अध्यक्ष