header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

संत श्री गजानन महाराज पालखीचे परभणीत उत्साहात स्वागत

भक्तीच्या वारीत आरोग्यसेवेचा मायेचा हात

हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी 

परभणी : शेगावहून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पायी पालखीचे परभणी शहरात भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. 

दत्तधाम येथे परभणी महानगरपालिकेच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने स्वच्छता, आरोग्य सेवा आणि वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी विशेष नियोजन केले होते. 

दत्तधाम ते वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मोंढा आणि रोकडे हनुमान मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालखी मार्गावर स्वच्छता कर्मचारी व घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

शिबिरात वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधे व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच पालखी मार्गावर सहा आरोग्य पथके, पुरेसा औषधसाठा आणि १०८ रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यात आली होती.

शिवरामनगर येथील संत कडूबाई मळा येथे पालखीच्या दुपारच्या विसाव्यादरम्यानही महानगरपालिकेने स्वच्छता आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. 

यावेळी उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे उपस्थित होते. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त गजानन जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, रमेश चव्हाण, उमेश जाधव, डॉ. साबिया खान, डॉ. स्वाती आडे, डॉ. सना अमराह, दत्तात्रेय हाके, निलेश जोगदंड, अंकिता घनघाव, बालाजी भरकड, गणेश सोलके तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पडावा यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सर्व विभागांना दक्ष राहण्याच्या सूचना देत वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90