हिंदु प्रकाश वार्ता प्रतिनिधी.
परभणी :जगदंबा शक्तीपीठ आखाडा कार्यक्षेत्र अखंड भारत च्या वतीने संभाजीनगर येथे पट्ट अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये पाच महामंडलेश्वर यांचा पट्टा अभिषेक सोहळा संपन्न झाला
या पट अभिषेक सोहळ्यासाठी जगदंबा शक्तिपीठ आखाड्याचे प्रमुख तथा अध्यक्ष श्री श्री 1008 महामंडलेश्वर धर्मगुरू डॉ श्री प्रदीप चैतन्य फाले महाराज, व तसेच आव्हान आखाड्याचे महामंडलेश्वर तथा जगदंबा शक्ती पीठ आखाड्याचे महामंत्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉ श्री विशालानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी कर्नाटक राज्यातील बेनकनळी बिदर येथील श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री कैलास नंदाजी सरस्वती महाराज,, श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री सचिदानंद. सरस्वती गुरु अशोक पवार महाराज, श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री रामानंद सरस्वती महाराज, श्री श्री 1008 नंदाताई आळंदीकर महाराज, श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री विकास नंदजी नवले सरस्वती महाराज लातूरकर, यांना महामंडलेश्वर पदवी बहाल करण्यात आली व त्यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला हे सर्व कार्यक्रम श्री श्री 1008महामंडलेश्वर डॉ विशालनंद सरस्वती यांच्याb मार्गदर्शनाखाली विविध राज्यातील गुरूंना सनातन हिंदु धर्म प्रसारक म्हणून व्यापक स्वरूपात काम करता यावे म्हणून श्री श्री महा मंडलेश्वरहीपदवी देऊन व त्यांचा पट्टभिषेक सोहळा करून त्यांना धर्माचे कार्य करण्यासाठी आदेश दिले जातात या मध्ये जगदंबा शक्तिपीठ आखड्याचे प्रमुख श्री श्री 1008.महा मंडलेश्वर प्रदीप फाले महाराज वर्षातून अनेक कार्यकर्माच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक प्रबोधत्मक कार्यकामाचे आयोजन करतात त्या पैकी हा पटशिष्य अभिषेक सोहळा हा कार्यक्रम द्वारकाधीश आश्रम श्रीराम मंदिर आप्पा वाडी शरणापुर फाटा छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या हर्षल्हासात पार पडला.