header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

आषाढी वारीत एमजीएमच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी; छोटा पंढरपूर येथे स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीबाबत जनजागृती

हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी वाळूज येथील प्रसिद्ध छोटा पंढरपूर येथे स्वच्छता मोहीम राबवत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत मंदिर परिसर आणि यात्रा मार्ग स्वच्छ करून भाविकांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने छोटा पंढरपूर येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरासह संपूर्ण यात्रा मार्गाची स्वच्छता केली. स्वयंसेवकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करून तो महानगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्राकडे सुपूर्द केला. यासोबतच पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व भाविकांना पटवून देत जनजागृतीही करण्यात आली.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी ‘मोबाईल व्यसनमुक्ती’, ‘प्लास्टिकला नकार’, ‘वाहन प्रदूषण नियंत्रण’, ‘निरोगी भारत – आपले ध्येय’, ‘स्वच्छता अभियान’ आणि ‘नशामुक्त भारत’ अशा विविध सामाजिक संदेशांचे फलक हातात घेऊन भाविकांना जागरूक केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भाविकांनीही उत्स्फूर्त स्वागत करत त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचे कौतुक केले.

ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ. विनोद मोकळे, प्रा. सोमनाथ काळेगावकर तसेच सर्व संबंधितांचे योगदान लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. आर. आर. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90