header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

परभणीच्या श्रद्धास्थानाला विकासाची नवी दिशा!- पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी.

परभणी :-गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ₹४८.५५ कोटींच्या विकास आराखड्यास माननीय मुख्यमंत्री  मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजुरी दिली, ही परभणी जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

या आराखड्यामुळे सांस्कृतिक सभागृह, गोदावरी घाट विकास, दर्शन मंडप, उद्यान व सुशोभिकरण, पाथवे, मंदिर ते घाट सिमेंट काँक्रिट रस्ता, गोरक्षण इमारत, संरक्षण भिंती, जलनिस्सारण व्यवस्था, विद्युत सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सौरऊर्जा, सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी आणि लँडस्केपिंग अशा अनेक विकासकामांमुळे भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

संत जनाबाईंच्या पावन जन्मभूमीचा गौरव वाढविणारा हा निर्णय गंगाखेडला राज्याच्या धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर अधिक भक्कम स्थान मिळवून देणारा ठरेल.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा वारसा जपत धार्मिक पर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार..!

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90