header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पंतप्रधान आवास योजनेतील हर्सूल सदनिकांच्या निकृष्ट कामाची चौकशी करा;  नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांची मागणी

 आयुक्त अमोल येडगे यांचे तातडीच्या कारवाईचे आश्वासन

हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या वतीने हर्सूल येथे सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांच्या बांधकामात गंभीर दर्जाहीनता झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल यांनी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे केली आहे. थर्ड पार्टी गुणवत्ता तपासणी संस्थेच्या (TPQMA) अहवालात कामाचा दर्जा अत्यंत सुमार असून इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

जैस्वाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २१ मे २०२६ रोजीच्या टीपीक्यूएमए अहवालात कामाबाबत अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. “The Quality Work is Extremely Poor & the Structural Stability is at Serious Risk” असा स्पष्ट अभिप्राय देण्यात आला असून, संबंधित कंत्राटदाराला काम तात्काळ थांबविण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तसेच स्टील रॉडचे लॅपिंग धोकादायक भागात करण्यात आल्याने इमारतीच्या मजबुतीवर परिणाम होऊ शकतो, असेही अहवालात नमूद असल्याचा दावा त्यांनी केला.

निविदेतील अटींनुसार भूमिगत पाण्याच्या टाकीसाठी एम-३० दर्जाचे काँक्रीट व वॉटरप्रूफ उपचार आवश्यक असताना प्रत्यक्षात विटांचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोपही जैस्वाल यांनी केला. याशिवाय कामगारांच्या सुरक्षेबाबतही गंभीर त्रुटी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. तसेच ईपीएफ, ईएसआयसी आणि व्यावसायिक कराबाबतही नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रकल्पावरील संबंधित अधिकारी कंत्राटदाराला लाभ मिळेल अशा पद्धतीने कामकाज करत असून निविदेतील अटींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांची बदली करून सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली. या सदनिकांमध्ये शहरातील गरीब व निराधार कुटुंबे वास्तव्यास येणार असल्याने निकृष्ट दर्जाच्या कामामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

थर्ड पार्टी अहवालाच्या आधारे सदर काम तातडीने थांबवून स्वतंत्र संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणी करावी आणि निविदेतील सर्व अटींचे पालन झाल्याशिवाय कंत्राटदाराची कोणतीही देयके अदा करू नयेत, अशी मागणी जैस्वाल यांनी केली.

दरम्यान, मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत संबंधित प्रकरणात तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90