header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

भाजपा हिंगोली तालुका ग्रामीण मंडळाच्या सरचिटणीसपदी उद्धव घ्यार यांची निवड

हिंगोली / गोपाल सातपुते

हिंगोली | भारतीय जनता पार्टीच्या हिंगोली जिल्हा आढावा बैठकीसह जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन रविवार, दि. ५ जुलै रोजी हिंगोली येथील रामाकृष्णा लॉज येथे करण्यात आले. या बैठकीत साटंबा येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते उद्धवराव घ्यार यांची भाजपा हिंगोली तालुका ग्रामीण मंडळाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

निवडीचे अधिकृत पत्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रभारी संजय कोडगे, राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे, आमदार तानाजी मुटकुळे पूर्व जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे  हिंगोली तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष माणिक लोडे यांच्या हस्ते उद्धव घ्यार यांना प्रदान करण्यात आले.

उद्धव घ्यार यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागात भाजपाची विचारधारा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याची भावना उद्धव घ्यार यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष

शिवाजी मुटकुळे भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, संजय कावडे अतिश दांडेगावकर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष उज्ज्वला तांबाळे भाजपा जिल्हा महामंत्री हिंगोली सुनीता मुळे शहराध्यक्ष रजनीश पुरोहित संदीप वाकडे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90