header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत परभणीच्या वतीने मुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत श्री शिवाजी महाविद्यालय, येथे जिल्हास्तरीय विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी 

परभणी, : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत परभणीच्या वतीने   मुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत श्री शिवाजी महाविद्यालय, येथे जिल्हास्तरीय विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे होते. अमली पदार्थ विरोधी पथक, नांदेड विभागाचे श्री. कोरंटलू प्रमुख उपस्थित म्हणून लाभले. जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट करत युवकांनी व्यसनमुक्त राहून विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी स्वतः व्यसनापासून दूर राहणे तसेच इतरांनाही त्याबाबत जागरूक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यानंतर श्री. कोरंटलू यांनी व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन केले. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी, जबाबदार आणि जागरूक नागरिक म्हणून जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले.

अभियानांतर्गत चित्रकला, वक्तृत्व, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री आणि रील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश आपल्या सादरीकरणातून दिला. वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी “नशा करायचीच असेल तर ती स्वप्नांची, मेहनतीची, यशाची आणि आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याची असावी,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

स्पर्धांचे पर्यवेक्षक म्हणून प्रा. डॉ. एस. एल. राठोड, प्रा. सविता कोकाटे, प्रा. अंकुश खटिंग, प्रा. स्वाती देशमुख, प्रा. अतुल समिंद्रे, प्रा. अनिल बडगुजर आणि प्रा. राधिका सोळंके यांनी जबाबदारी पार पाडली.

स्पर्धांमध्ये चित्रकला स्पर्धेत सिध्दी देशमुख, वक्तृत्व स्पर्धेत अनुसया कुलथे, रील स्पर्धेत शर्वरी सांगळे, घोषवाक्य लेखन स्पर्धेत गीता गिरकर आणि स्लॅम पोएट्री स्पर्धेत निकिता आसोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. तुकाराम फिसफिसे यांनी केले. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी होते.

कार्यक्रमासाठी सहाय्यक विभाग अधिकारी गजानन गाडेकर तसेच मेरा युवा भारतचे स्वयंसेवक दीपक खुळे आणि स्नेहा वाघमारे यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अनिल बडगुजर यांनी केले.

“नशेला नकार – विकसित भारताला होकार” हा संदेश युवकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापकवृंद, कर्मचारी, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, सहाय्यक विभाग अधिकारी गजानन गाडेकर, स्वयंसेवक दीपक खुळे, स्नेहा वाघमारे तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90