छत्रपती संभाजीनगर:
४ ते ० ऑगस्ट दरम्यान तगायते(फिलिपाईन्स) येथे एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनल दी जिम्नॅस्टिक्स तसेच जिम्नॅस्टिक्स असोसिएशन ऑफ द फिलिपाईन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.यात वरिष्ठ गटामध्ये स्मित शहा,मानसी देशमुख,श्रीपाद हराळ,आर्य शहा,रामदेव बिराजदार,उदय मधेकर,अद्वैत वझे,संदेश चिंतलवाड,अभय उंटवाल, विश्वेश जोशी,पार्थेश मार्गपवार,सायली वझरकर,राधा सोनी,कार्तिकी हेगडे,श्रेया लोंढे,संकेत चिंतलवाड,तनिष रोजेगावकर, गौरी खलाणे, विश्वेश पाठक, अनिकेत चौधरी,गौरी ब्राह्मणे, मुग्धा बावस्कर ,
कनिष्ठ गटात मध्ये ओम सोनी, जान्हवी रोंघे, रिधीमा आव्हाड यांची निवड भारतीय संघात झाली आहे.मणिपूर येथे ७ जून रोजी राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते त्यातून भारताचा संघ निवडण्यात आला .या निवड चाचणी मध्ये महाराष्ट्रातील २५ खेळाडूंची निवड भारतीय संघात झाली . तसेच १ ते ३१ जुलै दरम्यान मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी प्रा. डॉ.मकरंद जोशी तांत्रिक समिती सदस्य पंच म्हणून सिद्धार्थ कदम , प्रशिक्षक रोहित रोंघे,राहुल श्रीरामवार,हर्षल मोगरे संघ प्रमुख म्हणून इंद्रजीतसिंग राठोड यांची निवड करण्यात आली आहे.भारतीय संघ स्पर्धेकरिता ०२ ऑगस्टला मुंबई येथून रवाना होणार आहे.
जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर मित्तल,महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री.संजय शेटे, साई केंद्राच्या उपसंचालक डॉ.मोनिका घुगे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील,मसांमचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी, अध्यक्ष डॉ.आदित्य जोशी,उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार सचिव श्री.हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष श्री.रोहन श्रीरामवार,डॉ.विशाल देशपांडे,डॉ.सागर कुलकर्णी, महेश सोनी,अमेय जोशी,संदीप गायकवाड, राहुल तांदळे, शत्रुंजय कोटे,भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे,सौ.तनुजा गाढवे स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.