header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

परभणी शहर व जिल्ह्यातील सर्रास ठोक गुटखा विक्री करणारे व पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सलीम इनामदार यांची पोलीस अधीक्षका कडे केली मागणी

हिंदू प्रकाश वार्ता/ प्रतिनिधी

परभणी**परभणी शहरासह जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थावर कायम बंदी असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने गुटखा विक्री करणारे ठोक विक्रेते व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची सहानिशा करून चौकशी केल्यास निष्पन्न होणार प्रशासनातील कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची व विक्रेत्यांवर कारवाई करण्याची लोक श्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे मागणी केली आहे

अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल लोकेशन अथवा त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती च्या मोबाईल द्वारे संबंधित गुटके विक्रेत्यांच्याशी संपर्क लोकेशन द्वारे निष्पन्न होतील सर्रास अवैध गुटखा विक्री होत असल्याने प्रशासकीय कार्यालय गुटख्याच्या पिचकार्‍याने रंगलेल्या घाण व स्वच्छता दुर्गंधीयुक्त दिसत आहे

गुटखा विक्री करणारी कार्यरत असलेली टोळी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी स्थानिक गुन्हे शाखेतील काय कर्मचाऱ्यांच्या देखील यात समावेश असल्याचे समजते त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे सध्या बंदी असलेला गुटखा आर एम डी माणिकचंद गोवा सीतार राजनिवास विमल रजनीगंधा सुगं त तंबाखू रत्नाछाप तंबाखू बाबा तंबाखू तुलसी तंबाखू किमाम यासारख्या तंबाखूजन्य पदार्थामुळे अनेकांना कर्करोग होत असल्याने महा भयानक कॅन्सर सारखे रोग या सेवनामुळे होत आहे शाळकरी व महाविद्यालयातील विद्यार्थी या गुटक्याचे व तंबाखूच्या आहारी जात आहे यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सलीम इनामदार यांनी केली आहे या निवेदनाची प्रत सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन या विभागालाही देण्यात आली आहे अन्न व औषध प्रशासन विभाग का डोळ झाक करत आहे असा प्रश्नही परभणीतील जनतेला पडलेला आहे

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90