header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

बाबा टॉवर शॉपिंग कॉम्प्लेक्स चे अनधिकृत बांधकाम एक महिन्यात हटविण्याचे आदेश.

3620 चौरस मीटर बांधकामाचा समावेश. 

पाथरी नगर परिषदेची भागीदारी संस्थेला नोटीस.

हिंदू प्रकाश वार्ता /प्रतिनिधी 

परभणी**शहरातील बाबा टावर आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी पाथरी नगर परिषदेने संबंधित भागीदारी संस्थेला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 53 अन्वये 22 ऑक्टोबर गुरुवार रोजी ही नोटीस बजावली आहे नोटीस मिळाल्यापासून एक महिन्यातच अनधिकृत बांधकाम स्वतःच्या खर्चाने हटवून जागा पूर्वत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिक माहिती अशी की नगरपरिषदेच्या 22 जानेवारी 2020 च्या रोजीच्या नोटीसित जिल्हाधिकारी परभणी यांच्या १२ ऑक्टोबरच्या पत्रासह शासन विभागीय आयुक्त संचालक नगर रचना आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या चौकशी समितीच्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला आहे ही चौकशी अहवालानुसार 2004 मध्ये मंजूर सुधारित रेखांकन तात्कालीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार आवश्यक असलेल्या दहा टक्के खुलली जागा म्हणजेच 960.5 चौरस मीटर क्षेत्र सोडवण्यात आले नाही म्हणून स्थळ पाहणी आणि कायदेशीर प्रक्रिया न पाळतात मंजुरी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे तसेच 13 मे 2013 रोजी सुधारित बांधकाम परवानगी देताना जमिनीची मोजणी व आवश्यक कायदेशीर पडताळणी झाली नसल्याचा आक्षेपही घेण्यात आला आहे मूळ रेखांकन रहिवासी वापरासाठी असताना व्यवसायिक वापरासाठी सुधारित परवानगी घेतल्याचे अहवालात नमूद केलेले आहे तात्कालीन नगराध्यक्ष जुनेद खान दुरानी यांच्या कार्यकाळातील ठराव आणि संबंधित मालमत्ते तील हित संबंधित संबंधाबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

यामध्ये शुभम जनरल स्टोअर व सम्राट कलेक्शनच्या पायऱ्याचे ओटे इमारत रेषेत येत असल्याचे तसेच नऊ आर क्षेत्रातील पंधरा दुकानांचे बांधकाम इमारत व नियंत्रण रेषेत असल्याचे आणि आवश्यक परवानगी नसल्याचे अहवालात म्हटले आहे मंजूर नकाशाचे उल्लंघन हा सामाजिक अंतर इन सोडवण्याचाही ठपका आहे माळीवाडा येथील सर्वे क्रमांक नऊ ऑब्लिक एक मधील 3.427.22 चौरस मीटर भूखंडावर 3.620.91 चौरस मीटर क्षेत्राचे आरसीसी व्यावसायिक बांधकाम असल्याचे नोटिषद म्हणून नमूद करण्यात आले आहे संबंधित संस्थेने महिनाभरात बांधकामना हटवल्यास नगरपरिषद स्वतः कारवाई करून खर्च वसूल करणार आहे व त्यामुळे या प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यात प्रकरणाशी संबंधित नगरपरिषदेचे स्वीकरत नगरसेवक बाबाजानी दुरानी आणि त्यांचे नगरसेविका शाहिस्ता बेगम दुरांनी यांच्या सत्वा बाबत जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी 22 ऑक्टोबर रोजी सुनावणीची नोटीस बजावली आहे पात्री येथील माळीवाडा परिसरात गृहनिर्माण संस्थेच्या मंजूर अभिन्यासातील खुली जागा सेवा रस्ता आणि 15 दुकानाच्या बांधकाम परवानगीतील कथित अनियमितेसह सुधारित अभि न्यासाच्या वैधतेबाबत नगरसेवक गोविंद हरकळ आणि इतर दोघांनी तक्रार केली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील कलम 44/1/e /नुसार अपात्रतेची मागणी करण्यात आली आहे याप्रकरणी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90