सोयगाव,दि.८ जून
तालुक्यातील दुर्गम भागातील रामपूर वाडी,न्हावी तांडा, निंबायती,पिंपरी,रामपूर तांडा येथील अंगणवाडी तील बालकाची आरोग्य तपासणी करून यातील २६ बालकांना मोफत औषधी वाटप करण्यात आली.
प्रकल्प कार्यालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिरात. पाच गावांतील अंगणवाडीतील बालकाची आरोग्य तपासणी करण्यात आली.या उपक्रमाचे संयोजक संजय शहापूरकर यांनी सांगितले की कुपोषण कमी करण्यासाठी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी हा उपक्रम सुरू केला असून्य बालकांना मोफत औषधी वाटप करण्यात येते.
आज वैद्यकीय अधिकारी डॉ.खालिद झाकी व डॉ.पठाण यांनी बालकाची आरोग्य तपासणी केली.याप्रसंगी अंगणवाडी सेविका नंदाबाई दांडगे,वंदनाबाई चव्हाण, रंजना जाधव,मीरा मोरे यांच्यासह मदतनीस उपस्थित होते.