header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

राशनचे धान्य गहू व तांदूळ  घेऊन काळ्या बाजारात विक्रीसाठी  जाणारे वाहन पोलिसाच्या ताब्यात.

 आठ लाख 39 हजाराचा मुद्दे माल जप्त.

 दैठना पोलिसाची कार्यवाही 

परभणी: परभणी शहरातुन गंगाखेड कडे अवैधरित्या काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशनचा गहू व तांदूळ दैठना पोलिसांनी जप्त केला आहे. या कार्यवाहीत सुमारे आठ लाख 39 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तग त करण्यात आला असून बोलेरो मॅक्स पिकप वाहन जप करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रविवार 28 जून रोजी परभणी शहरात पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमी दाना मार्फत माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची बोलोरो मॅक्स पिकप वाहनातून रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्रीसाठी गंगाखेड येथील बाजारपेठेत नेण्यात येत आहे या माहितीच्या आधारे शिंगणापूर फाट्यासमोरील चैनल जवळील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचून संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 48 कट्टे गहू व 24 कट्टे तांदूळ आढळून आला. संबंधिताकडे धान्याची वाहतूक व विक्री बाबत कोणताही वैद्य परवाना नसल्यामुळे पंचनामा करून वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला व सदर मुद्देमाल व अहवाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी घटना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माणिक वाघ सिद्धेश्वर चाटे नामदेव दुबे शरद सावंत राम पौळ बाळू सपकाळ यांनी कारवाई केली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90