header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

कृषी सप्ताहानिमित्त मोढा बुद्रुक येथे शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न

सिल्लोड, दि. 3 जुलै 2026* – मौजे मोढा बुद्रुक, ता. सिल्लोड येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरास परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

प्रमुख मार्गदर्शक कृषी अधिकारी श्री. सुनील सूर्यवंशी यांनी सघन कापूस लागवड पद्धती, हुमणी अळीचे एकात्मिक नियंत्रण व खतांचा शास्त्रीय वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. विस्तार अधिकारी (कृषी) श्री. विश्वास बनसोडे यांनी मका व कापूस पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) व बीज प्रक्रियेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. आशिष मस्के यांनी कृषी सप्ताहाचे महत्त्व सांगून शासकीय घरकुल योजनेतील अडचणींवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास सरपंच सौ. हावळे, श्री. संभाजी हावळे, श्री. राजेंद्र लांडगे, विस्तार अधिकारी श्री. जोगेंद्र अहिरराव यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रीय शेती पद्धतीची माहिती मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90