हिंदू प्रकाशवार्ता/प्रतिनिधी
सोयगाव,दि.१३ जुलै
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित प्रोत्साहनात्मक अनुदान २०२५-२६ वितरण,गुणगौरव व सन्मान सोहळा कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगावने उल्लेखनीय यश संपादन केले.महाविद्यालयाने सोयगाव तालुक्यात प्रथम तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळविला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पवार व क्रीडा विभागाचे प्रा.शेख तौफिक यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच जिल्हा परिषद उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी त्यांना प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी,प्रमाणपत्र तसेच भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जीवनावरील पुस्तक प्रदान करण्यात आले.महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे हा सन्मान प्राप्त झाला असून या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी,प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी तसेच पालकांनी डॉ.शिरीष पवार व प्रा. शेख तौफिक यांचे अभिनंदन केले.या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.