header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या चेहऱ्याला जिल्हाध्यक्ष करणार :- शशिकांत शिंदे

हिंगोलीतील राष्ट्रवादी भवन येथे जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न

हिंगोली | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आगामी काळात अधिक सक्षम आणि जनाधार असलेली संघटना उभी करण्यासाठी राज्यभरात संघटन विस्तारावर भर देणार असून, नव्या कार्यकर्त्यांना संधी देत प्रत्येक गाव आणि प्रत्येक बूथपर्यंत पक्षाची ताकद पोहचविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.

नाईक नगर परिसरातील  राष्ट्रवादी भवनात गुरुवारी 16 जूलै रोजी आयोजित पक्षाच्या पदनियुक्ती व संघटन विस्तार बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर  माजी आमदार सुनील भुसारा जिल्हा प्रभारी पंकज बोराडे  प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीआंबिरे माजी आमदार विजय गव्हाणे यांची उपस्थिती होती 

पुढे बोलतांना शशिकांत शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष आहे. आगामी काळात जनतेच्या प्रश्‍नांवर अधिक आक्रमक भूमिका घेतली जाईल. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची खरी ताकद असून, बूथस्तरापासून संघटना मजबूत करण्यासाठी व्यापक अभियान राबविले जाणार आहे. हिंगोली जिल्हा हा शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा असून, पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा येथे पक्षाचे मजबूत संघटन उभारण्यात येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला व येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी गाव तिथे शाखा करून 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा जिल्ह्यात फडकला पाहिजे व रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर पक्षांसाठी प्रामाणिक काम करणाऱ्या चेहऱ्याला हिंगोली जिल्हाध्यक्ष पदाची संधी या आठवड्यात भरात देऊन त्यानंतर 

महिन्यात मोठा पक्षाचा मेळावा घेणार

असल्याचे  त्यांनी सांगितले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष रवी शिंदे हिंगोली विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे कळमनुरी विधानसभा अध्यक्ष गणेशराव गडदे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे युवक जिल्हाध्यक्ष सोनू चव्हान माधव कोरडे 

हिंगोली तालुकाध्यक्ष धीरज काकडे अल्पसंख्याक आघाडी आयुब पठाण सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष भास्कर कुऱ्हे वसमत माजी तालुकाध्यक्ष बाबुराव दळवी मोईन बागवान राजू भाबळे प्रभू शिंदे रमेश जाधव यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रत्येक बूथवर पक्ष मजबूत करणार…

         प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाची ताकद बूथस्तरावर वाढविण्यावर विशेष भर दिला. प्रत्येक गाव, प्रत्येक बूथ आणि प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ असल्याचे सांगत आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पदाधिकार्‍यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले व बूथ तिथे कार्यकर्ता गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90