राज्यातील पहिलाच प्रयोग
हिंदू प्रकाशवार्ता/प्रतिनिधी
सोयगाव,दि.२६ जुलै
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात येथे झालेल्या महाआरोग्य शिबिर तसेच मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी व नूतनीकरण प्रमाणपत्र वितरण शिबिरात २०० दिव्यांगना जागेवरच दिव्यांग प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. आहे.या शिबिरात तालुक्यातील २ हजार विविध दिव्यांगाची आरोग्य तपासणी करण्यात आली होती.यामध्ये २०० जणांना जागेवरच प्रमाण पत्र वितरण करण्यात आले. राज्यातील हा पहिलाच तालुकास्तरावर प्रयोग असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कमलाकर मुदखेडकर ( जिल्हा शल्यचिकित्सक चिखलठाणा संभाजीनगर ) यांनी दिलेल्या भेटदरम्यान सांगितले.
तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी हा उपक्रम
सुरू करण्यात आला असून यात लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड सुद्धा वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी दिली.तालुका भाजपचे वतीने आयोजित या एक दिवसीय दिव्यांगाच्या शिबिरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत २००० दिव्यांगा ची तपासणी पूर्ण झाली होती तर दोनशे दिव्यांगाना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते.भाजप चे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी
यांनी आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेऊन ही मोहीम राबवण्याची मागणी केली होती.त्या अनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्रासाठी छत्रपती संभाजीनगर येथे खेट्या माराव्या लागत होत्या.आता त्यांना जागेवरच प्रमाणपत्र देण्यात आले आहे.या शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दोन हजार दिव्यांग नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून,पात्र २०० लाभार्थ्यांना जागेवरच नवीन व नूतनीकरण दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.दरम्यान या शिबिरात जिल्हा परिषद सदस्या माहीन मुलतानी, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे,जेष्ठ नेते सुरेश बनकर,अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी,सोयगाव पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण,सोयगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील,पश्चिम चे तालुकाध्यक्ष सुनील जाधव,पंचायत समिती सदस्य राहुल राठोड,जयश्री पवार,जिल्हा चिटणीस सुनील गावंडे, सोयगाव शहराध्यक्ष मंगेश सोहनी,व्ही जे एन टी चे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण,मयुर मनगटे,गजानन पवार,संजीवन सोनवणे,राजेंद्र जावळे,वसंत बनकर,माजी उपगराध्यक्ष योगेश पाटील,आदींनी पुढाकार घेतला होता.