फुलंब्री, प्रतिनिधी : दि (1)
भारतीय जनता युवा मोर्चाच्या छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हा उपाध्यक्षपदी अजिनाथ सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे फुलंब्री तालुक्यासह पूर्व जिल्ह्यातील भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पक्षाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल अजिनाथ सोनवणे यांनी महामहीम राज्यपाल मा. हरिभाऊजी बागडे, माजी केंद्रीय मंत्री ,रावसाहेब पाटील दानवे, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण, विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाठ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र बाबा जयस्वाल, पंचायत समिती सभापती सर्जेराव पाटील मेटे, वडोद बाजार मंडळ अध्यक्ष गोपाल वाघ, फुलंब्री मंडळ अध्यक्ष सुचित बोरसे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब तांदळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ऋषी नरवडे, राजेंद्र पाटील डकले, कृष्णा पाटील सोनवणे यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले.
प्रतिक्रिया………..
यावेळी अजिनाथ सोनवणे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. या विश्वासाला पात्र ठरत पक्षाची संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी, युवकांना संघटित करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने कार्य करत राहीन.”