संतोष करपे
छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष दूल्हा रह. यांच्या ७४०व्या उरुसाला गुरुवारी पारंपरिक संदल मिरवणुकीने उत्साहात सुरुवात झाली. उरुसाची सांगता २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी होणार असून, २३ ऑगस्ट रोजी हजरत बाबा बुन्हानोद्दीन यांच्या ठिकाणी मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संदल मिरवणुकीत ढोल-ताशा, विविध वैजापूर येथील प्रसिद्ध असलेला हबीब भाई चाऊस बँड पथकांचा सहभाग होता. बँड पथकांनी सादर केलेल्या जुन्या देशभक्तीपर गीतांमुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला. मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दारूगोळ्याची आतषबाजीही करण्यात आली.
उरुस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष गुट्टे, मुख्याधिकारी तथा सचिव समीर, शेख नगराध्यक्ष आमेर पटेल, दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, उपाध्यक्ष इमरान जागीरदार, सचिव मोहम्मद मतीन जहांगीरदार, माजी नगराध्यक्ष सदस्य दर्गा कमिटी एड. कैसरोद्दीन यांच्यासह मुनिबोद्दीन, मुबशिरोद्दीन, शेख युसुफ, सालेह मोहम्मद, हबीबोद्दीन, मुजीबोद्दीन, हाफिजोद्दीन, कामरानोद्दीन आणि अबरार अहमद उपस्थित होते.
, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे, वरिष्ठ लिपिक अंकुश भराड पाटील पाणीपुरवठा इंजिनियर श्रीहरी चौडेकर मुख्य लेखपाल किशोर मोरे वरिष्ठ लिपिक जितेंद्र बोचरे, पाणीपुरवठा कर्मचारी अशोक भंडारे, शेख इरफानोद्दीन, भानुदास सोनवणे सतीश भालेराव नितीन गोल्हार यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उरुसाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी के. के. गवळी, बीट जमादार शेख जाकीर यांच्यासह पोलीस कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उरुस परिसरात तसेच संदल मिरवणुकीच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार न घडता पारंपरिक संदल मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पडली.