दैनिक हिंदू प्रकाश वार्ता
छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी दि ३१ वेरूळ श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्य दर्शनासाठी लाखो भाविकांची प्रचंड गर्दी पायी दिंडी व कावड यात्रा. मोठ्या प्रमाणात रविवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली होती भाविकांनी ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’चा जयघोष करत घृष्णेश्वरा १२ वे ज्योतिर्लिंग भगवंताचे दर्शन घेतले.
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह. वेरूळ लेणी पाहण्यासाठीही पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
मंदिरापासून जोडरस्त्यापर्यंत बॅरिकेड्स लावून दर्शनासाठी रांगेची व्यवस्था मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती.
गाभाऱ्यातील अभिषेक श्रावणच्या महिनाभर बंद करण्यात आलेली आहे
मंदिर परिसरातील मागील गेट हे दर्शन करून भाविकांना व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी केलेले आहे त्यासाठी यावर्षी प्रथमच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांची नियुक्ती करण्यात आलेली आहे
व याच गेटने वेरूळ गावा तील नागरिक ठरवून दिलेल्या वेळेत व आलेल्या विशेष व्हीआय पी लोकांसाठी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी वापरल्या जात आहे
परंतु मंदिर ट्रस्टच्या नियोजन शून्य कारभारामुळे वेरूळ तांडा. येथील नागरिक. तसेच छत्रपती संभाजी नगर . खुलताबाद परिसरातील पत्रकार यांना आत जाण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष किंवा ट्रस्टीशी बोलणं करून द्या जर आपण त्यांच्या ओळखीचे असाल तर आपल्याला सोडण्यात येईल नाश्ता आपल्याला आत जाता येणार नाही अशी भूमिका येथे कार्यरत असलेल्या जवानांनी घेतल्यामुळे अनेक भाविक भक्त वापस गेले व्हीआयपी च्या नावाखाली अनेक भाविक याच गेटने जवानासमोर घुसखोरी करून जाताना दिसत होते
(भारतीय जनता पार्टीचे वेरूळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा घृष्णेश्वर मंदिर ट्रस्ट संस्थानचे अध्यक्ष कुणाल दांडगे हे कायम नॉट रिचेबल असल्यामुळे या ठिकाणी देशभरातून येणाऱ्या भाविकां भक्तांना येणाऱ्या अडचणी बाबत कोणाशी संपर्क करा हा प्रश्न आहे)
भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही, छुपे कॅमेरे, खासगी सुरक्षारक्षक तसेच पोलिस कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभवत