बंद काळात अत्यावश्यक सेवा सुरू. व्यापारी प्रतिष्ठाने बंद मध्ये सहभागी
हिंदू प्रकाश वार्ता अशोक पवार
परभणी:- मराठा आरक्षण चे प्रणेते व संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या बंदच्या हाकेला व बंदच्या आव्हानाला शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली त्यामुळे प्रमुख बाजारपेठेसह विविध भागातील रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला बंदचा फार मोठा परिणाम जाणवला असून सकल मराठा समाजाने वतीने परभणी शहरातील रॅली काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या आव्हानाला हाकेला ओ देत परभणी शहर नेहमी गजबजलेले असते अशा बाजारपेठेमध्ये अत्यावश्यक सेवेचे अतिरिक्त कुठलेही दुकान चालू नव्हते सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे विविध व्यवहारावर बंदचा फार मोठा परिणाम झाला असून अनेक व्यवसायिकांनी आपली प्रतिष्ठांनी स्वयं स्मृतीने बंद ठेवत म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठीमा दर्शवला असल्यामुळे त्यामुळे शहरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नेहमीचे लगबग दिसून आली नाही आज जिल्हा संवर्धन मंडळाच्या वतीने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणारी घटक चाचणी परीक्षा ही रद्द करण्यात आली आजचे नियोजित पेपर आता शनिवारी 5 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून त्यामुळे बंदचा थेट परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झाला आहे शहरातील बंद झाली असल्याने बाजारपेठेत नेहमी वर्दळीच्या ठिकाणी गर्दी दिसली नाही कुठलाही अनुसूचित प्रकार घडून यासाठी शहरातील प्रमुख चौक बाजारपेठा व संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता चौका चौकात पोलीस कर्मचारीयांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने बंदच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखणे यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व पद्धतीने सहकार्य केले असून मनोज रंग यांच्या स्मरणात पुकारलेल्या बंदमुळे परभणी शहरातील व्यवहार शैक्षणिक आणि दैनंदिन जीवनावर नेहमीच्या रुटींवर फार मोठे चित्र पाहायला मिळाले असून परभणी शहरात ग्रामीण भागातील रोजगार मजूर येत असतात त्यांना दिवसभर काम केले तर संध्याकाळी खायला भाकरी मिळते अशा आंदोलनामुळे परिस्थिती बिकट होते आरक्षण सर्वांना मिळावे या भूमिकेसाठी मंजूर मजूर लोकांनी सुद्धा या बंदच्या प्रतिसादला संपूर्णपणे पाठिंबा दर्शवला होता.