header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

हायवेवर मारहाण करून लुटणारी कुख्यात टोळी गजाआड धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची सिनेस्टाईल कारवाई

पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न थरारक पाठलाग करत ३ सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव (प्रतिनिधी शेख हक्कानी 

हायवेवरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून मारहाण करत जबरी लूट करणाऱ्या एका कुख्यात टोळीचा धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने LCB पर्दाफाश केला आहे ही कारवाई इतकी थरारक होती की आरोपींनी चक्क पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी जिवाची बाजी लावत सिनेस्टाईल पाठलाग करून या टोळीतील ३ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत

असा घडला थरार

पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ६ सप्टेंबर २०२६ रोजी पेट्रोलिंग करत होते पहाटे ०५:५० च्या सुमारास सोनेगावकडे जाणाऱ्या रोडवर एक आयशर टेम्पो MH 24 BW 9506 भरधाव वेगाने येताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने टेम्पो थेट पोलिसांच्या अंगावर घातला पोलिसांनी प्रसंगावधान राखून थोडक्यात स्वतःचा जीव वाचवला आणि पळून जाणाऱ्या त्या भरधाव टेम्पोचा थरारक पाठलाग सुरू केला

अखेर आंबेजवळगा शिवारात स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या टेम्पोला अडवून तिघांच्या मुसक्या आवळल्या, तर इतर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले

अटकेत असलेले आरोपी

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे खालीलप्रमाणे आहेत आनंद उर्फ आकाश शामराव पवार वय २७ रा. आळणी ता. जि. धाराशिव

बाल्या उर्फ सोनू अशोक शिंदे वय २३ रा. गोळेगाव ता. भूम जि. धाराशिव

शंकर गणा काळे वय २४ रा. जयभवानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव

२४ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि गुन्ह्यांची कबुली

या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी ढोकी धाराशिव ग्रामीण शिराढोण नळदुर्ग हद्दीत सोलर केबल चोरल्याची तसेच हायवेवर नागरिकांना कारमधून अडवून मारहाण करत लुटल्याची कबुली दिली

पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला आयशर टेम्पो एक अर्टिगा Ertiga कार चोरीचे सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण २४,०८,०५० रुपयांचा चोवीस लाख आठ हजार पन्नास रुपये मुद्देमाल हस्तगत केला आहे पुढील तपासासाठी या तीनही आरोपींना धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

यांच्या पथकाने केली धडक कारवाई

ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार सपोनि अमोल मोरे पोहेकॉ राहुल नाईकवाडी बळीराम शिंदे अमोल चव्हाण चालक पोकॉ केदार शेरखाने विनायक दहींडे प्रकाश बाईनवाड आणि QRT पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90