header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

फर्दापूर बस स्टॉपवर एसटी चालकाची दादागिरी वयोवृद्ध प्रवाशाला चक्क दगड उचलून मारहाणीचा प्रयत्न लालपरी’च्या कर्मचाऱ्याला एवढा माज कुठून आला

फर्दापूर प्रतिनिधी शेख हक्कानी 

फर्दापूर 

सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या MSRTC काही कर्मचाऱ्यांची मुजोरी आता कहर करत आहे फर्दापूर बस स्टॉपवर सोमवारी सकाळी चक्क एका एसटी चालकाने भररस्त्यात गुंडगिरी करत एका वयोवृद्ध व्यक्तीवर दगड उगारल्याची आणि अश्लील शिवीगाळ केल्याची अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी प्रवाशांचे ‘सेवक’ आहेत की गुंड असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे

 भर बस स्टॉपवर चालकाचा गुंडाराज 

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ठीक १० वाजता फर्दापूर बस स्टॉपवर छत्रपती संभाजीनगर–पाचोरा मार्गावर धावणारी बस क्र. MH-20-BL-3281 आली यावेळी काही कारणावरून बसमधील चालकाचा एका वृद्ध व्यक्तीसोबत वाद झाला वादाचे पर्यावसान इतक्या टोकाला गेले की या उद्दाम चालकाने स्वत च्या सीटवरून खाली उतरत थेट रस्त्यावरचा एक मोठा दगड उचलला आणि तो त्या वयोवृद्ध व्यक्तीच्या अंगावर उगारला! सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांच्या गजबजाटात एका चालकाने अशी गुंडगिरी करणे हा एसटी प्रशासनाच्या प्रतिमेवर मोठा डाग आहे

वयाचाही आदर नाही शिविगाळीने परिसर हादरला

या चालकाने केवळ दगडच उगारला नाही तर त्या वयोवृद्ध व्यक्तीला अत्यंत अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली तुझे वय काय आणि तू बोलतोय काय या साध्या संस्कृतीचाही विसर या चालकाला पडला चालकाच्या या रागीट आणि हिंसक पावित्र्यामुळे बस स्टॉपवर उपस्थित असलेल्या महिला लहान मुले आणि इतर प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती काही काळ तर तिथे तणावाचेच वातावरण होते एका वयोवृद्ध नागरिकाला मारहाण करायला धावणाऱ्या या चालकाला एवढा माज आणि मुजोरी आली कुठून

प्रशासनाची कारवाई होणार की नुसतीच बघ्यांची भूमिका

एसटी महामंडळ प्रवाशांच्या जिवावर चालते पण जर महामंडळाचे चालकच प्रवाशांवर दगड उगारून त्यांचे जीव घेण्यावर टपले असतील तर प्रवाशांनी सुरक्षेसाठी कुणाकडे पाहायचे या भयंकर घटनेनंतर संतप्त नागरिकांनी या चालकावर कठोर कारवाईची मागणी उचलून धरली आहे

आमचा थेट इशारा

एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगार प्रमुख आणि पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घ्यावी बस MH-20-BL-3281वरील या उद्दाम चालकाची तातडीने चौकशी करून त्याला निलंबित करावे जर या मुजोर चालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर प्रवाशांचा रोष प्रशासनाला महागात पडेल असा कडक इशारा आता संतप्त नागरिकांकडून देण्यात येत आहे

 एसटी प्रशासनाने या घटनेवर तातडीने खुलासा करावा आणि प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे नसल्याचे सिद्ध करावे

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90