header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

सेवानिवृत्त ACP अनिल गायकवाड यांच्या सुरांना वन्समोर

‘मिक्स बॉलीवुड पार्ट-३’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गायकवाडांनी सादर केली आठ गाणी

हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : सेवानिवृत्त ACP अनिल गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संत एकनाथ रंगमंदिरात ‘स्वरवीर प्रस्तुत मिक्स बॉलीवुड पार्ट-३’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रसिकांसाठी हा कार्यक्रम मोफत ठेवण्यात आला होता. जुन्या हिंदी गीतांनी रंगलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अनिल गायकवाड यांनी स्वतः आठ गाणी सादर केली. ‘मैं आया हूं साज’ या गीताने त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यानंतर विविध गीते सादर करत त्यांनी रसिकांची दाद मिळवली. अखेरीस सादर केलेल्या ‘ओम शांती ओम’ या गीताला रसिकांनी विशेष प्रतिसाद देत वन्समोरचा आग्रह केला.

पुण्याहून आलेल्या भाग्यश्री डुंबरे यांनी १२ गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘सुन सायबा सुन प्यार की धुन’ या गीताने त्यांनी सुरुवात केली. चंद्रकांत कांबळे यांच्यासोबत त्यांनी सादर केलेली ‘सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था’ आणि ‘दिन सारा गुजारा तेरे कंगना’ ही युगलगीते विशेष गाजली. या गीतांनाही रसिकांनी वन्समोरचा आग्रह केला.

कार्यक्रमात गणेश देशपांडे, डॉ. अतुल पोरे, डॉ. कुशल जैन, विक्रांत खाडे, चंद्रकांत कांबळे, धम्मपाल हिवराळे, रेखा पोळ आणि अश्विनी जोशी-देशपांडे यांनीही विविध गीते सादर केली. कार्यक्रमाचे संयोजन सुनंदा गायकवाड आणि अ. आर. राज यांनी केले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90