पर्यटकांकडून लाखो रुपयांची वसुली पण सुविधांच्या नावे बोंब अस्वच्छतेमुळे महाराष्ट्राच्या अब्रूचे वेशीवर धिंडवडे
फर्दापूर प्रतिनिधी शेख हक्कानी
अतिथी देवो भव ची जाहिरात करत जगभरातील पर्यटकांना साद घालणाऱ्या पर्यटन विभागाचा अजिंठा लेणीत मात्र बोजवारा उडाला आहे अजिंठा लेणीच्या बेस कॅम्पवरील शॉपिंग प्लाझा आणि शटल बस थांब्याला अक्षरश उकिरड्याचे स्वरूप आले असून पर्यटकांकडून लाखो रुपये उकळणारे एमटीडीसी आणि एसटी प्रशासन नक्की झोपा काढतंय का असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी दररोज हजारो देशी विदेशी पर्यटक येतात लेणीपर्यंत जाण्यासाठी त्यांना एसटीच्या शटल बसशिवाय दुसरा पर्याय नाही मात्र या बसच्या प्रतीक्षेत तासन्तास रांगेत उभ्या राहणाऱ्या पर्यटकांसाठी असलेल्या थांब्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे प्रशासनाने पर्यटकांना बसण्यासाठी येथे बाकडे आणि कंपाऊंड बांधले आहे पण या जागेवर कचरा उष्ट्या वस्तू आणि प्राण्यांच्या विष्ठेचे ढीग साचले आहेत दुर्गंधीमुळे तिथे उभे राहणेही कठीण झाले आहे
साफसफाईच्या कंत्राटात गोलमाल
एमटीडीसी आणि एसटी महामंडळ दररोज पर्यटकांकडून तिकीट आणि विविध करांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूल गोळा करते मग हा पैसा जातो कुठे साफसफाईसाठी नेमलेले कंत्राटदार केवळ कागदोपत्रीच काम दाखवून बिले लाटत आहेत का आणि अधिकाऱ्यांचे या कंत्राटदारांशी साटेलोटे आहे का असे गंभीर प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत प्रशासनाला फक्त पर्यटकांचे खिसे कापण्यात रस आहे सुविधा देण्याशी त्यांना काहीही देणेघेणे नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका पर्यटकाने दिली
आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी
अजिंठा लेणी हा जागतिक वारसा असल्याने येथे परदेशी पर्यटकांची मोठी वर्दळ असते मात्र येथील हा अस्वच्छतेचा नरक पाहून ते आपल्या देशाबद्दल आणि राज्याबद्दल काय प्रतिमा घेऊन जात असतील याचा विचारही प्रशासनाला राहिलेला नाही
पर्यटन मंत्र्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भोंगळ कारभाराची तातडीने दखल घ्यावी कामचुकार कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा संतप्त पर्यटकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात येत आहे