जसखार ग्रामपंचायत सदस्य हेमंत ठाकूर यांचे सदस्य पद रद्द.
उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )दि.२४/०९/२०२६ रोजी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेल्या निर्णयानुसार रत्नाकर म्हात्रे (रा. जसखार) यांच्या बाजूने निर्णय देत हेमंत ठाकूर ग्रामपंचायत जसखार मु. जसखार ता. उरण येथील सदस्य म्हणून राहण्यास अनार्ह्य ठरविले आहे.
आज पासून ६ वर्ष अगोदर रत्नाकर म्हात्रे यांनी जसखार ग्रामपंच्यात सदस्य हेमंत ठाकूर यांच्या विरोधात गावातील सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्याबद्दल जिल्हाधिकारी रायगड समवेत इतर शासकीय ठिकाणी तक्रार केली होती हीच तक्रार अखेर मान्य करत जिल्हाधिकारी ठाणे यांनी रत्नाकर म्हात्रे यांच्या बाजूने निकाल देत हेमंत ठाकूर यांचे सदस्य पद रद्द केले.