उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
महिलांच्या अंगभूत कौशल्याचा त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा सन्मान करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणेची दिशा देणारा ” नवदुर्गा सन्मान सोहळा २०२६ ” उरण येथील गुरुकुल ॲकॅडमी,आधार फाऊंडेशन सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२६ यांच्या सौजन्याने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपल कर्तुत्व सिद्ध करून समाजाच्या उन्नतीसाठी आपला वेळ, ऊर्जा, आणि नेतृत्व समर्पित करणार्या महिलां भगिनींचा अर्थात नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला त्यात रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याची शान आणि वेश्वी गावाचा अभिमान आगरी लेक सागरी कन्या कुमारी सृष्टी राजश्री राजेंद्र मुंबईकर ही मेरीटाईम क्षेत्रातील मर्चंड नेव्ही मध्ये जागतिक दर्जाच्या मर्क्स कंपनीने १३५ वर्षां नंतर पहिल्यांदाच मुलींना प्राधान्य देण्यात आले.आणि त्यात संपूर्ण देशभरातून तब्बल ४,५०० मुलीं मधून ३९ मुलींना निवडण्यात आले त्यात अथांग सागराला गवसणी घालत आपल्या कवेत सामावून घेणारी रायगडची सागरी कन्या सृष्टी मुंबईकर हिची निवड करण्यात आली.अश्या ह्या सागराला गवसणी घालणारं कर्तृत्व आणि त्यातून मिळालेलं अभूतपूर्व यश संपादन करून जागतीक दर्जाच्या मर्क्स कंपनीच्या समुद्री जहाजावर गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत आपली कार्यकालीन ड्युटी बजावताना आत्ता पर्यंत चायना, हाँगकाँग, सिंगापूर,मलेशिया,व्हिएतनाम, आफ्रिका, युरोप, लंडन ,अमेरिका न्यूयॉर्क अश्या अनेक देशांची भ्रमंती करून सध्या अमेरिका न्यूयॉर्क येथे आपली डय़ुटी बजावत आहे आणि म्हणुनच सृष्टी मुंबईकर हिच्या ह्या कर्तृत्ववान उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन उरण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या पुढाकारातून गुरुकुल ॲकॅडमी तसेच आधार सावली फाऊंडेशन सार्वजनिक नवरात्र उत्सव यांच्या सौजन्याने ” नवदुर्गा सन्मान २०२६ ” हा मानाचा पुरस्कार शाल ,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन खर्या अर्थाने ह्या नवदुर्गेचा सन्मान करण्यात आला. सृष्टी मुंबईकर हिच्या वतीने तिचे आई बाबा राजू मुंबईकर आणि राणीताई मुंबईकर यांनी पुरस्कार स्वीकारून समाजात आपलं आयुष्य स्थान निर्माण करणाऱ्या आपल्या लेकीच्या कर्तुत्वाला सलाम केला.हा सोहळा केवळ पुरस्कार सोहळा नसून महिलां भगिनींच्या संघर्षांला आणि यशाला दीलेली कौतुकाची थाप होती.अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत पार पडलेला हा कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.