header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पाण्याखाली दडलेले ‘मृत्यूचे सापळे’; प्रशासन जागे होणार तरी कधी?

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002520958.jpg

जलवाहिनी व पाईपलाईन कामांसाठी खोदलेले खड्डे पहिल्याच पावसात जलमय

 सिद्धेश्वर थोर

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांत जलवाहिनी टाकणे आणि जुन्या पाईपलाईनच्या दुरुस्तीची कामे सुरू असताना खोदण्यात आलेले खोल खड्डे पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्याने नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याखाली दडलेले हे खड्डे आता अक्षरशः ‘मृत्यूचे सापळे’ बनले असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील अनेक भागांत जलवाहिनी आणि पाईपलाईनच्या कामांसाठी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून ते वरून सामान्य पाणथळीसारखे वाहत आहेत. प्रत्यक्षात त्याखाली किती खोल खड्डा आहे, याचा अंदाज नागरिकांना येत नसल्याने दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

विशेष बाब म्हणजे अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक असलेले बॅरिकेड्स, परावर्तित फलक, इशारा सूचना किंवा रात्रीच्या प्रकाशव्यवस्थेचा पूर्णपणे अभाव आहे. काही ठिकाणी केवळ औपचारिकता म्हणून फीत बांधण्यात आली असली तरी ती अपघात रोखण्यासाठी पुरेशी नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

दैनिक हिंदू प्रकाश वार्ताने यापूर्वीही शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अर्धवट खोदकामे आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र वारंवार वृत्त प्रसिद्ध होऊनही संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही. परिणामी आजही अनेक भागांत नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.

सायंकाळनंतर आणि रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. अंधारामुळे खड्डे स्पष्ट दिसत नाहीत. पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याचा आणि खड्ड्याचा फरक ओळखणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत एखादे वाहन घसरून खड्ड्यात गेल्यास किंवा एखादा नागरिक त्यात पडल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली अनेक कामे अद्याप रखडलेली आहेत. खोदकाम करून रस्ते अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने वाहतुकीसह नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहे चौका चौकात मोठे खड्डे खोदून ठेवले आहे. पाण्याखाली किती खोल खड्डा आहे हे समजत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलं, महिला, दुचाकीस्वार, फोर व्हीलर वाला त्या ठिकाणी पडल्यास मोठे दुर्घटना होऊ शकते. सुरक्षाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बॅरिकेट्स किंवा सूचना फलक लावावे.

— स्थानिक रहिवासी

“रात्रीच्या वेळी या मार्गाने जाणे धोकादायक झाले आहे. लांबून काही दिसत नाही जवळ आल्यानंतर कळतंय की या ठिकाणी खड्डा आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जलवाहिनीसाठी खड्डे खोदण्यात आले आहे. त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था म्हणून बॅरिकेट्स किंवा सूचनाफलक लावावे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90