header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत आमखेडा ता.सोयगाव २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; पतसंस्थेची मोठी वाटचाल सोयगाव तालुक्यात नविन शाखा ओपन करा – तेजस्विनी काळे

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/IMG_२०२६०६२६_२१५३३१.jpg

हिंदू प्रकाशवार्ता/ प्रतिनिधी 

सोयगाव,दि.२६ जून 

श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत आमखेडा ता.सोयगाव २३ वार्षिक सर्वसाधारण सभा अमृतबाग हाँटेल येथे दि.२६ शुक्रवार रोजी १०:३० वाजता सुरुवात करण्यात आली.यावेळी दिप प्रज्वलन करून व श्री स्वामी समर्थ प्रतिमा पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली.सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गोंदिया येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांची विशेष उपस्थिती होती.तर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोयगावचे मॅनेजर धीरज भुरे, तेजस्विनी काळे,डॉ.मलहान पटेल,आमखेडा ग्रामपंचायत प्रशासक नंदा आगे,आमखेडा माजी सरपंच गजानन ढगे, शिवसेना सोयगाव तालुका प्रमुख दिलीप मचे(ठाकरे गट), निंबायती गावाचे सरपंच राजू पाटील,माजी सरपंच धनसिंग राठोड,कंकराळा सोसायटी माजी सभापती रवींद्र पाटील, गलवाडा माजी सरपंच सुरेखा तायडे,खरेदी विक्री संघाचे मॅनेजर बन्सीलाल बेडवाल,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रमेश जाधव,प्रदीप रोकडे,कै.बाबुरावजी काळे पतसंस्थेचे व्हा. चेअरमन योगेश बोखारे,कै.बाबुरावजी काळे पतसंस्थेचे

मॅनेजर सिताराम गोतमारे,भैरवनाथ पतसंस्था मॅनेजर गोविंदा औरंगे,तिरुपती अर्बन बँकेचे मॅनेजर विकास देसाई, कृष्णा शेवाळकर,योगेश काळे,पतसंस्थेच्या संचालिका विमलबाई निकम,जरंडी मुख्याध्यापक देविदास पाटील, आमखेडा पोलीस पाटील अंबादास ढगे,पत्रकार मंडळी,आमखेडा ग्रामपंचायत सचिव कडुबा ठाकरे,सामाजिक कार्यकर्ते दत्तू रोकडे,बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे दत्ता गाडेकर,ग्रामीण बँक जरंडीचे ज्ञानेश्वर सुस्ते, मयुर मनगटे,संजय मोरे,बाबु शहा, संदिप सोहणी,अमृतबाग हॉटेलचे संचालक शुभम गिरी,आदींसह मान्यवर मंडळी तसेच संस्थेचे सभासद व खातेदार,संस्था अध्यक्ष ॲड.राजेश भैय्या गिरी,उपाध्यक्ष विष्णु दुसाने,संचालक सर्वश्री आकाश वरकड,युवराज आगे,एस.टी.पाटील,बाबु पटेल,सतिश कोलते,अर्जुन बोडखे,कदीर शहा,राहुल गोसावी,रवि अप्पा इंगळे,अमोल निकम व कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील,सुनिल सैंदाने,देवा बैरागी,गणेश पवार, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश कोलते यांनी केले व आभार अध्यक्ष राजेश गिरी यांनी मानले यानंतर स्नेह भोजन कार्यक्रम पार पडला.

कोट- श्री स्वामी समर्थ पतसंस्था ही सहकार तत्त्वावर चालणारी एक महत्त्वाची आर्थिक संस्था आहे.सर्वसामान्य नागरिकांना,सभासद व छोटे मोठे व्यापारी यांना आणि कर्मचाऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करून देणे आणि बचतीची सवय लावणे हा या संस्थांचा मुख्य उद्देश असतो.

तर माझी पतसंस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांना सोयगाव तालुक्यात अजून नविन शाखा ओपन करा असे कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलताना सांगितले 

– तेजस्विनी काळे 

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90