संपूर्ण जिल्ह्यातून 13084( शिक्षक) विद्यार्थी देणार होते पात्रता परीक्षा.
हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी.
परभणी : महाराष्ट्राचे परीक्षा परिषद मार्फत रविवारी 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करण्यात आली असून याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परिस्थिती पत्रकाद्वारे कळवले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून रविवार रोजी घेण्याचे प्रस्तावित असतानाच मागे घडलेल्या नीट परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या इकडे इकडे वतीने टीईटी परीक्षेसाठी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या तथापि शनिवारी 27 जून रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमाकडे या प्रश्न काही गुप्त माहिती असल्याचे कळल्याने पोलीस पोलीस प्रशासन सज्ज होऊन भिवंडी पोलीस यांनी सदर या ठिकाणी धाड टाकली. तपासणीसाठी महाराष्ट्राचे परीक्षा परिषदेचे अधिकारीने पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा (टी ई टी )जून 2026 या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले सदर प्रकरणातील गुन्ह्याची नोंद भिवंडी पोलीस ठाण्यात करण्यात आली यामुळे रविवार दिनांक 28 जून रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा(टी ई टी )पुढे ढकलण्यात आली आहे याबाबत सखोल चौकशीसाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे शिक्षक पात्रता परीक्षा (टी ई टी )बाबत अद्यावत माहिती महाराष्ट्राचे परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शनिवारी 27 जून रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे