हिंदु प्रकाश वार्ता प्रतिनिधी
परभणी : पूर्णा तालुक्यातील ताडकळस बाजार समितीच्या आवारात श्रीपाद ट्रेडिंग कंपनीच्या संचालक यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी केला त्यात प्रामुख्याने सोयाबीनहे होते काही शेतकऱ्यांना थोडे बहुत पैसे दिले. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना एक रुपया सुद्धा दिला नाही. शेतकऱ्यांनी वारंवार मार्केट कमिटी सचिवा कडे तक्रार केली एक महिन्या पूर्वी उप निबंधक यांच्या कडे तक्रार केली होती परंतु व्यापारी यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. एकीकडे तुडपुंज्या पाऊसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हा पासुन पाऊसाचे दांडी मारली शेतातले पीक जळून जात आहे. आणि मागील वर्षी दिलेले सोयाबीन चे पैसे व्यापारी देत नाही आणि तो ताडकळस सोडुन आपल्या आई वडिलांना बायको पोरांना घेऊन पळून गेला आहे.
बाजार समितीने व्यापाऱ्याला पाठीशी घातल्या मुळे ताडकळस परिसरातील शेतकरी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात आपली तक्रार नोंदवली तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी परभणी येथील उप निबंधक यांच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर उप निबंधक यांनी ताडकळस बाजार समितीच्या सचिवांना तात्काळ पत्र काढून संबंधित व्यापाऱ्यावर तात्काळ पोलिस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा नोंदवा व त्याचे मार्केट कमिटी मध्ये असलेले दुकान जे त्या व्यापाऱ्याने विकुन फरार झालेला होता. ते दुकानाचा फेर तात्काळ रद्द करण्यात यावा असे असे पत्र देण्यात आले तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उप निबंधक यांना दोन दिवसाचा वेळ देण्यात आला. या दोन दिवसाच्या आत व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर परत स्वाभिमानी आपल्या स्टाईलने आंदोलन करणार असे सांगण्यात आले. जो पर्यंत शेतकऱ्यांचे पैसे व्यापारी देणार नाही तो पर्यंत स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम पणाने लढणार …यावेळी किशोर ढगे, मुंजा लोडे, माऊली शिंदे,राम गोळेगावकर, भगवान अंभोरे, मुंजा अंभोरे, गजानन अवरगंड, जनार्धन होणमाने यांच्या सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.