दैनिक हिंदू प्रकाश वार्ता
छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी खुलताबाद शहरां मध्ये शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या आणि जिद्द, मेहनत व कर्तृत्वाच्या जोरावर पोलीस निरीक्षकपदापर्यंत भरारी घेतलेल्या नितीन आप्पासाहेब खंडागळे यांनी नुकताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला आहे. आपल्या खुलताबाद शहरातील वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्याने पोलीस दलात उच्च पद गाठल्याने खुलताबादकरांसह मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांचे वडील आप्पासाहेब खंडागळे हे सन १९९९ ते २००४ या कालावधीत खुलताबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. त्यावेळी बातमीदारी करतांनी आप्पासाहेब खंडागळे साहेबांचा जवळून संबध आला होता.
त्या काळात खंडागळे कुटुंबीय पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. नितीन खंडागळे यांनी इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण श्री घृष्णेश्वर महाविद्यालय, खुलताबाद येथे, तर पदवी शिक्षण चिश्तिया महाविद्यालय, खुलताबाद येथे पूर्ण केले.
शिक्षणानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून परभणी, नांदेड व गंगाखेड येथे सेवा बजावली. त्यानंतर पदोन्नती होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून मुदखेड, बारड, येवला आदी ठिकाणी जबाबदारी सांभाळली. अलीकडेच पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे कार्यरत होते. तेथील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयांतर्गत दौलताबाद पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
नवीन पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी पत्रकार सुनील घोडके यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात भेट घेऊन नितीन खंडागळे यांचा सत्कार केला. यावेळी खंडागळे यांनी खुलताबादमधील शालेय व महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच, “पत्रकारांना आम्ही लहानपणी जवळून पाहिले आहे. खुलताबादशी माझे जिव्हाळ्याचे नाते कायम राहील,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी त्यांच्य भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आपल्या मातीत वाढलेला एक विद्यार्थी आज पोलीस निरीक्षकपदापर्यंत पोहोचल्याने खुलताबादकरांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छां