वायरल व्हिडिओ नंतर शिक्षण विभाग जागे झाले. 40 पोते तांदूळ शील बंद.
हिंदु प्रकाश वार्ता /अशोक पवार परभणी : पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील राजश्री शाहू विद्यालय शालेय पोषण साठवून ठेवलेले अन्नधान्यांमध्ये चक्क किडे व जाळे आढळून आल्याचे पोहोचताच मोठी खळबळ उडाली व शिक्षण विभाग खडबडून जागे झाले आहेरवाडी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद विभागाकडे लेखी तक्रार केल्यानंतर 15 जुलै रोजी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली याबाबत सविस्तर माहिती अशी की आहेरवाडी येथील राजश्री शाहू महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या अनेक दिवसापासून किडे व जाळे असलेले अन्नधान्य पोषण आहारात वापरले जात असल्याचे वारंवार तक्रार करूनही याकडे शिक्षण विभागकाना डोळा करत होता सर्व प्रकरणाचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी किरण सुरोडवाड, विस्तार अधिकारी बालाजी कापशीकर केंद्रप्रमुख सुभाष शिंदे आदीच्या पथकाने दुपारी दीडच्या सुमारास शाळेची प्रत्यक्षपाहणी केली असता दरम्यान पोषण आहारासाठी ठेवण्यात आलेल्या अन्नधान्याचा साठ्यातील 42 पोत्यां मध्ये धान्य साठ्यामध्ये चक्क किडे व जाळे आढळून आल्याने तपासणीसाठी गेलेले अधिकाऱ्यांनी धान्य साठवणूक पक्षाला सीलबंद करण्याचे निर्देश दिले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता संबंधित तांदूळ हा जुना साठा असल्याचे त्यांनी सांगितले असल्याचे माहिती मिळाली या प्रकरणाबाबत मुख्याध्यापकांनी अधिकृत खुलासा केलेला नाही गटशिक्षणाधिकारी किरण शिरोडवाड यांनी सांगितले की मुख्याध्यापकाकडून सविस्तर खुलासा अहवाल मागविण्यात आला असून तो प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येईल या संदर्भात मुख्याध्यापकांनी खुलासा अहवाल सादर करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दोन वेळेस भेट देऊन तरी त्यांचा अहवाल अद्याप स्वीकारण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले शालेय पोषण आहाराच्या मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे या प्रकरणाला शालेय प्रशासन जबाबदार असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू असून अंतिम निर्णयाकडे व ग्रामस्थांचे लक्ष लागले असून शिक्षण विभाग काय निर्णय घेतो हे पहावे लागेल.