header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध

 जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

हिंदु प्रकाश वार्ता प्रतिनिधी.

परभणी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी यांच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयात 27 वा कारगिल विजय दिवस कृतज्ञतापूर्वक साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धातील शहीद जवानांना अभिवादन करून त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह शहीद जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि शहीद जवान यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शहीद जवानांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व शहीद कुटुंबीयांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना देशसेवेच्या आठवणींना उजाळा दिला. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी कारगिल विजय दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुराधा ढालकरी यांनीही माजी सैनिकांच्या योगदानाचा गौरव केला.

याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील कार्य आणि माजी सैनिकांसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सुभेदार विश्वनाथ सातपुते यांना प्राप्त झालेल्या ‘सैनिक रत्न’ पुरस्काराबद्दल त्यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ लिपिक अनंत ओगले, कल्याण संघटक हरीभाऊ माने, लिपिक गणपत संसारे, दिलीप ससाणे उपस्थित होते.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90