header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पोलीस पाल्यांची यशोगाथा; गुणवंतांचा ग्रामीण पोलीस दलाकडून गौरव

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002421771.jpg

‘मोठी स्वप्ने पाहा, पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी’ – पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव

छत्रपती संभाजीनगर, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा विशेष गौरव सोहळा शनिवारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस मुख्यालयात उत्साहात पार पडला.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या भविष्यातील ध्येयांविषयी जाणून घेतले. “मोठी स्वप्ने पाहा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिस्तीच्या बळावर ती पूर्ण करा. तुमच्या उच्च शिक्षणासाठी पोलीस प्रशासन कायम पाठीशी उभे राहील,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.

अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनीही विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करत या यशातून इतर पोलीस पाल्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या नऊ विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अनुष्का दत्तात्रय सुयवंशी (९५.४०%), सारिका योगेश तरमाळे (९४.८०%), ओमकार दत्तात्रय सुयवंशी (९४.७६%), हर्षल सुनिल पवार (९४%), देवेन विनोद पदमणे (९३.२०%), सिद्धांत सुनिल ठोंबरे (९३%), आकांक्षा महेश घुगे (९२.०६%), तनुजा शिवाजी मुदेवाड (९१.६०%) आणि रुषी भानुदास चव्हाण (९१.६०%) यांचा यामध्ये समावेश होता.

पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण पोलीस कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी मानले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90