header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला परतूर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

परतूर, दि. २ जून २०२६ :
पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला परतूरच्या वतीने आज मंगळवार दिनांक २ जून २०२६ रोजी श्री श्री रविशंकर ध्यान केंद्र, परतूर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यावेळी भारतीय संरक्षण दलामध्ये निवड झालेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्याचा तसेच इयत्ता दहावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ३२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला परतूरचे मुख्याध्यापक मा. गणेश राठोड सर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये श्री भगवानराव मोरे तात्या, दया काटे महाराज तसेच रमाकांत बेरीदे सर यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व, कठोर परिश्रम, सातत्य आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले पूजनाने करण्यात आली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, फाईल फोल्डर व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेचा विद्यार्थी आशिष उद्धवराव भिसे याची भारतीय संरक्षण दलामध्ये निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांसाठी त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मा. गणेश राठोड सर म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मोठे यश संपादन करू शकतात. आज आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश ही संपूर्ण परतूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इतर आकर्षणांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
श्री भगवानराव मोरे तात्या यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “यशासाठी आत्मविश्वास आणि सातत्य आवश्यक आहे. अपयश आले तरी खचून न जाता नव्या जोमाने प्रयत्न करावेत.” दया काटे महाराज यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, प्रामाणिकपणा आणि शिस्तीचे धडे दिले. रमाकांत बेरीदे सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात स्वतःला सक्षम बनवण्याचे आवाहन केले. पालकांच्या वतीने विठ्ठल मामा कुलकर्णी यांनी शाळेने घेतलेल्या मेहनती बद्दल शिक्षकांचे व व्यवस्थापन समितीचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रशालेच्या अजय पद्माकर गोरे याने ९६.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रद्युम्न अक्रूर गोरे याने ९४.८० टक्के गुणांसह द्वितीय तर वैष्णवी तुकाराम अंभुरे हिने ९३.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच साक्षी परमेश्वर भोसले – ९२.२०, पुष्पा नानासाहेब बिल्हारे – ९०.८०, पार्थ अंकुश कोल्हे – ८९.६०, अर्जुन परमेश्वर काकडे – ८९.६०, अमृता दत्ता घोरमाडे – ८९.४०, सचिन प्रकाश वाघमारे – ८८.२०, शिवराज नामदेव जोगडे – ८६.६०, अंगद नागेश जाधव – ८६.४०, आर्या विठ्ठल कुलकर्णी – ८५.२०, अनुज प्रकाश टिपरसे – ८४.४०, आरुष संतोष घोडके – ८४.४०, आकांक्षा अनिल ढेकळे – ८३.००, यशराज राजाराम जाधव – ८२.८०, भक्ती प्रकाशराव देशपांडे – ८२.४०, स्वराज सुदाम शिंदे – ८२.००, राजनंदिनी हनुमान काळे – ८१.००, प्रतीक्षा दिनेश आढे – ७९.८०, आरती दिगंबर मोगरे – ७९.००, विठ्ठल कैलास धुमाळ – ७८.४०, सागर जगदीश वाळके – ७८.४०, राधिका अरुणराव खरात – ७७.८०, दीपक दत्ता राऊत – ७७.८०, क्रांती शिवाजी मुळे – ७७.०० आणि विद्या गजानन भांडवलकर – ७६.२० टक्के गुण मिळवत प्रशालेचे नाव उज्ज्वल केले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षकवृंद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत असताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कैलास गाडगे सर आणि श्रीमती तरोटे मॅडम यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती देताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेहनतीचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
समारोप प्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90