header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जिल्हा परिषदेच्या कामकाजावर आमदार बंब यांचा कडक सवाल

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002431091-1.jpg

जलजीवन मिशन, शिक्षण विभागासह विविध योजनांची घेतली झाडाझडती; १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर,  गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत अनेक योजनांच्या अंमलबजावणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विकासकामांमधील त्रुटी, प्रलंबित प्रश्न आणि कामांच्या गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांनी संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांवर विशेष चर्चा करण्यात आली. अनेक गावांमधील योजनांच्या प्रगतीबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याचे सांगत कामांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची आवश्यकता आमदार बंब यांनी व्यक्त केली. निधीचा वापर, कामांची गुणवत्ता आणि पूर्णत्वाची स्थिती याबाबत स्वतंत्र तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

शिक्षण विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न आणि प्रशासकीय नियंत्रण यावर चर्चा करत शिक्षण व्यवस्थेत अधिक शिस्त आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शिक्षकांच्या उपस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांशी संबंधित काही जुन्या प्रकरणांवरही चर्चा झाली. अनियमिततेच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी भूमिका आमदार बंब यांनी मांडली.

बैठकीच्या शेवटी सर्व विभागांनी १५ दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. विकासकामांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करावे, असे आवाहन आमदार बंब यांनी केले.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90