सोयगाव सह शिवारात शनिवारी रात्री सात वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतातील दोन खोल्या वरील पत्रे हवेत उडून नुकसान झाले आहे. दरम्यान शनिवारी रात्री सात वाजेनंतर वादळी वाऱ्याने तासभर तडाखा दिला यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.सोयगाव शिवारात मयुर सुरेश मनगटे यांच्या गट क्र. १७२ मध्ये असलेल्या दोन खोल्या वरील पत्रे वादळाने उडून खोल्या च्या भिंती ढासळून नुकसान झाले आहे.दरम्यान सोयगाव शिवारात झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे व या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.