header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश उत्सवातून विद्यार्थ्याचे आनंदात स्वागत.

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1001406400.png

 हिंदू प्रकाश वार्ता परभणी प्रतिनिधी.

 शाळा म्हणले की लहान लहान चिमुकल्या मध्ये उत्साह शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्याच्या चेहऱ्यावरला आनंद व पालकाच्या डोळ्यातील समाधान आणि स्वागतासाठी सजलेली शाळा व शिक्षक वृंद अशा उत्साह पूर्ण वातावरणात मानवत येथील पी एम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रवेश उत्सवाने अंदाज करण्यात आली शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीतील विद्यार्थी व त्यांच्या पालकाचे गुलाब पुष्प व शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती वैशाली पंकजराव आंबेगावकर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा राणी अंकुश लाड नगरसेवक मोहन लाड मुख्याधिकारी कोमल सावरे पंचायत समितीचे उपसभापती सुरज भैय्या काकडे सदस्य श्री शिंदे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राणीताई गोलाईत उपाध्यक्ष विलास बारहाते सदस्य श्रीराम पखवाने रामभाऊ गोलाईत गायकवाड यांच्या सह सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते शाळेच्या पहिल्याच दिवशी येता पहिलीतील नवीन प्रवेशित विद्यार्थी व पालकांचे स्वागत जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटोळ यांनी प्रस्ताविकातून शाळेची गुणवत्ता पालक समाजाच्या सहकार्यामुळे विविध स्पर्धा परीक्षा आणि उपक्रमाच्या माध्यमातून  वृद्धी गत होत असल्याचे सांगितले जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी मुलांच्या शिक्षणात पाल कांची महत्त्वाचे भूमिका असल्याचे सांगत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच मुलीचे शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे लक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनया कीर्तनकार यांनी केले या कार्यक्रमासाठी गावातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90