अजींठा प्रतिनिधी सय्यद जमीरोद्दीन
दोन दशकांच्या लढ्याला मोठे यश; ५९ गावे अन् १३ तलाठी सज्जांचा समावेश असणार १ कोटी ४५ लाखांचा निधी जमा; इमारतीसाठी जागा निश्चित
मंत्र्यांनी सूचना दिल्या
अजिंठा गावाला तालुक्याचा
दर्जा मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे. शासनाने अजिंठा येथे ‘अप्पर तहसील कार्यालय’ सुरू करण्यासाठी २४ जून रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. यामुळे सिल्लोड तालुक्यातील ५ महसूल मंडळे आता अजिंठा अप्पर तहसील कार्यालयास जोडली जाणार असून, सिल्लोड तहसीलचा प्रशासकीय भार कमी होणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी दिली.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही संबंधित बैठकीत कार्यालयीन इमारतीच्या बांधकामाची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. सरकारच्या मंजुरीनंतर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
सिल्लोड तालुक्यातील एकूण ११ महसूल मंडळांपैकी अजिंठा, शिवना, अंभई, उंडणगाव आणि गोळेगाव बुद्रुक ही ५ मंडळे सिल्लोड तहसील कार्यक्षेत्रातून वगळून नवीन अजिंठा अप्पर तहसील कार्यालयाला जोडली जातील. या
अजिंठा अप्पर तहसीलचा नकाशा.
विभाजनानंतर सिल्लोड तहसीलच्या कार्यक्षेत्रात सिल्लोड, निल्लोड, आमठाणा, पालोद, बोरगाव बाजार आणि भराडी ही ६ मंडळे कायम राहतील.
अजिंठा अप्पर तहसीलमध्ये एकूण ५ महसूल मंडळे, ५९ गावे, १३ तलाठी सजा, एक फॉरेस्ट ऑफिस, एक पोलिस ठाणे, ४ जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गणांचा समावेश असेल. या कार्यालयाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६५८ चौरस कि. मी. राहणार असून, या अंतर्गत सुमारे १ लाख ९५ हजार लोकसंख्या असेल, तर सिल्लोड तहसील अंतर्गत २ लाख ४५ हजार लोकसंख्या राहणार आहे.
अजिंठा-शिवना रस्त्यावरील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ १८ गुंठे जागेत हे नवीन अप्पर तहसील कार्यालय साकारण्यात येणार आहे. यासाठी लागणारा १ कोटी ४५ लाख रुपयांचा आवर्ती व अनावर्ती खर्च जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाला आहे. प्रशासकीय पातळीवरील तयारी पूर्ण झाली असून, यासंबंधीची जाहीर सूचना सिल्लोड तहसील, पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय आणि अजिंठा ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
4 करार
प्रस्तावित अजिंठा अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असणार आहेत. याअंतर्गत ८ पंचायत समिती गणांचाही समावेश असणार आहे. या अंतर्गत सुमारे १ लाख,९५ हजार लोकसंख्या असणार आहे.
.
अजिंठ्याला तालुक्याचा दर्जा, नगरपंचायत आणि अप्पर तहसील मिळावे, म्हणून आम्ही गेल्या २० वर्षापासून लढा अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले आहे. आता अजिंठा गावाला पूर्ण तालुका आणि नगरपंचायत बनविण्यासाठी आमचा पाठपुरावा शासन दरबारी सुरूच राहील.
मशहूद मुगीस चाऊस, अध्यक्ष, अजिंठा तालुका निर्मिती कृती समिती