header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जिल्हा परिषद शाळा रामजीनगर येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड; अध्यक्षपदी कडुबा सपकाळ निवड

सोयगाव,दि.२८ जून 

स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,रामजीनगर येथे चालू शैक्षणिक २०२६-२८ वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समिती (SMC) अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सदस्यांची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली.या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

शाळेच्या प्रगतीमध्ये पालकांचा आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढवणे,तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला गती देणे या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली.

पालक बैठकीत झालेल्या चर्चेनुसार खालीलप्रमाणे निवड करण्यात आली ती खालील प्रमाणे 

अध्यक्ष कडुबा मधुकर सपकळ,उपाध्यक्षा सुनीताबाई दत्तात्रय जोहरे,सचिव रघुनाथ रामदास काटोले (शाळेचे मुख्याध्यापक) तर सदस्य समितीमध्ये नियमानुसार ५०% महिला प्रतिनिधी,अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी, वंचित घटकातील प्रतिनिधी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.यामध्ये मिलिंद निकम,विद्या कळवत्रे,वैशाली पवार,रघुनाथ इंगळे,मंगला छाडेकर,वैशाली ठोंबरे,रामा भारवाड,राजू कुडके शिक्षण प्रेमी,शंकर जेठे सामाजिक गट,योगेश बोखारे शिक्षण तज्ञ यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून किरण सुरडकर,डिम्पल ठोंबरे यांची निवड करण्यात आली.बैठकीच्या सुरुवातीला मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अधिकार, कर्तव्ये आणि शाळेच्या विकासातील त्यांचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.त्यानंतर नवीन समितीसाठी गावातील पालकांमधून नावांचे प्रस्ताव मागवण्यात आले.संपूर्ण निवड प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोध पार पडली.

नवनियुक्त अध्यक्षांनी गावकऱ्यांचे आभार मानत सांगितले कि शाळेचा भौतिक विकास करणे,डिजिटल शिक्षणाला प्राधान्य देणे आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे याला आमचे पहिले प्राधान्य असेल.

या प्रसंगी माजी विद्यार्थी अध्यक्ष राजू कुडके,शंकर जेठे, योगेश बोखारे,विनोद सुरडकर,गुमफाबाई इंगळे,सपना इंगळे,शकुंतला कळवत्रे,मंदाबाई इंगळे,यासोबत मोठ्या संख्येने माता-पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षक गोपाल चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ काटोले मानले.सर्व उपस्थितांनी नूतन समितीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90