हिंदू प्रकाशवार्ता | अंधारी
दि. ५ जुलै : सिल्लोड तालुक्यातील दिडगाव येथे घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. १८ वर्षीय नातू हर्षल कैलास शेजुळ याच्या निधनाची बातमी समजताच त्याची आजी पार्वताबाई शंकर शेजुळ यांना तीव्र धक्का बसला. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
एकाच कुटुंबातील अल्पावधीत झालेल्या दोन निधनांमुळे शेजुळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दिडगाव गावातही हळहळ व्यक्त होत आहे. हर्षलच्या अकस्मात मृत्यूची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पो. ह. राजेंद्र काकडे करीत आहेत. दरम्यान, नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आजीचाही मृत्यू झाल्याची चर्चा गावात असून, त्यांच्या निधनामुळे शेजारी, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. एकाच घरातील दोन व्यक्तींच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून शेजुळ कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.