header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

बिबट्या चा चक्क वावर भोशी शेत शिवारात.

 व्हिडिओ व्हायरल झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.

हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी 

 परभणी: जिंतूर तालुक्यातील भोसी  येथील शेत शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये चांगलीच घाबरगुंडी उडाली व भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोमवार दिनांक 6 जुलै रोजी रात्री अकरा वाजण्यास महाराज घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण बनल्यामुळे शेतकरी अस्वस्थ बनले आहेत.

 मिळालेल्या अधिक माहितीनुसार भुशी येथील शेतकरी विष्णू लाखांडे यांच्या शेतात ट्रॅक्टर द्वारे मशागतीचे काम सुरू होते यावेळी ट्रॅक्टरने पाणी घालत असतानाच अचानक शेतात बिबट्या दिसून आला कधी कुणाच्या धानी न म्हणे पण अनपेक्षितपणे समोर आलेल्या चक्क बिबट्याला समोर बघितल्यानंतर ट्रॅक्टर चालक व शेतमालक मजुरांची त्यांच्यात घाबरगुंडी उडाली राजासारखा शेतात वावरत असताना दिसला या घटनेची  मोबाईल मध्ये चित्रीकरण केले असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहे या घटनेची नंतर भोसी सह परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषता सकाळी लवकर आणि संध्याकाळी वेळेत शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांची सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली असून शेतातील जनावरांच्या सुरक्षिततेबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे येथील ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवावे व परिसरात गस्त वाढवावी तसेच आवश्यकतेनुसार पिंजरा लावून बिबट्याला सुरक्षित रित्या पकडण्याची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून जाता सुरक्षित अंतर ठेवावे त्यांना हुसकवण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये तसेच तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी. वन विभागाने संबंधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90