header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेच्या नवीन प्रस्तावास मंजुरी.

 समितीच्या सर्व सदस्यांची उपस्थिती. परभणी मनपा स्थायी समितीची बैठक.

हिंदु प्रकाश वार्ता प्रतिनिधी.

परभणी : या अगोदर महानगरपालिकात मंजूर असलेले समांतर पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार काम त्वरित रद्द करून नवीन नवीन वस्ती व प्रभागाचा समावेश करत नवीन सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. बुधवार दिनांक आठ जुलै रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

 स्थायी समिती सभापती प्रतिभा अतुल सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी स्थायी समितीचे बैठक झाली   यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर सचिव विकासरत्न पारखे यांच्यासह स्थायी समितीमधील सदस्य भगवान वाघमारे,सुनील देशमुख, नदीम इनामदार, आकाश लहाने, डॉ केदार  खटिंग,अक्षय देशमुख, वेंकट डहाळे, अर्जुन सामाले, शेख रईस शेख हबीब, सागर गंगाळे,   नौसीन अलीम कुरेशी, प्राप्ती विकास राजापुरे,सुलोचना मदनराव भालेराव,सपना वेंकटराव जुकटे,यांची उपस्थिती होती.

 स्थायी समितीच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर परभणी शहरातील विविध विकास कामात संदर्भात चर्चा करण्यात आली. प्रत्येक सदस्याने शहरातील समस्या सोडविण्याबाबत सूचना दिल्या व शहरात होणाऱ्या भूमिगत गटार पाणीपुरवठा योजनेचे जुने काम रद्द करण्यात यावे असा ठराव पारित करून सर्व सदस्यांनी मंजुरी दिली.

 सदर कामाला चार वर्षांपूर्वी घेतलेल्या आराखड्यानुसार व जुन्या दरानुसार मंजुरी देण्यात आल्यामुळे हे काम अर्धवट होणार असल्याचे सदस्यांनी बैठकीत मांडले शहराची वाढलेली व्याप्ती लक्षात घेऊन तसेच आजचे कामाचे दर पाहिले असता नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या मागणीला एक मताने मंजुरी देण्यात आली शहरातील वाढलेल्या व नवीन वस्त्या व प्रभागाचा या दोन्ही योजनेमध्ये समावेश होणार आहे. सध्याला पावसाळा सुरू असून स्वच्छतेच्या कामाला मंजुरी देण्यात आली व जिथे जिथे खड्डे पडले आहेत त्या खड्यामध्ये मुरूम टाकण्या ऐवजी कच टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90