header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पोलीस ठाणे शिल्लेगाव – अवैध धंद्यांविरोधात धडाकेबाज कारवाई

पो नि श्री प्रमोद पाटील यांनी दिनांक 02/07/2026 रोजी पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे शिल्लेगाव यांचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत मा पोलीस अधीक्षक श्री प्रकाश जाधव सो, मा अप्पर पोलीस अधीक्षक सो, छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, मा उ वि पो अधिकारी सो गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीतील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात धडाकेबाज मोहीम राबवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मागील अनेक वर्षांत न झालेल्या प्रमाणात प्रभावी कारवाया करून गुन्हेगारी प्रवृत्तींवर मोठा अंकुश निर्माण केला आहे.

या कालावधीत करण्यात आलेल्या कारवायांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

*दारूबंदी कारवाई – एकूण 12 गुन्हे दाखल करून ₹83,180 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये सुमारे ₹50,000 किंमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली.

*जुगारविरोधी कारवाई – एकूण 6 रेड टाकून ₹1,56,348 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

*NDPS कारवाई – 01 कारवाई करून सुमारे ₹87,000 किंमतीचा अंमली पदार्थ गान्जा जप्त करण्यात आला. यामध्ये 5.092 किलो ओलसर गांजाची झाडे तसेच 708 ग्रॅम गोणीत भरलेला गांजा जप्त करण्यात आला.

*गुटखा कारवाई- – 02 कारवाई करून ₹6354 किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.

*अवैध वाळू वाहतूक*

– 02 गुन्हे दाखल करून एकूण ₹14,15,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

*अवैध वाळू साठा जप्त – अंदाजे 50 ब्रास वाळू (किंमत ₹2,50,000) व 175 ब्रास वाळू (किंमत ₹8,75,000) असा एकूण 225 ब्रास वाळूचा साठा, अंदाजे ₹11,25,000 किंमतीचा, जप्त करण्यात आला.

वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवायांमुळे पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीतील अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसला असून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. या धडाकेबाज मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शिल्लेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांकडून पोलीस दलाच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

यापुढेही अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती व समाजकंटकांविरुद्ध अशाच प्रकारे कठोर कारवाया सुरू राहतील, असा निर्धार पोलीस ठाणे शिल्लेगावतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90