header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जात पडताळणी समितीला टाळे ठोकणार, महादेव कोळी समाजाच्या बैठकीत निर्धार..

 हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधि

परभणी:मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचे संशोधन न करता मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या बाबतीत असलेले ब्रिटिश कालीन, निजाम कालीन, संदर्भ ग्रंथ, संशोधनपर ग्रंथ,गॅजेट, जनगणना याकडे जाणीवपूर्वक लक्ष करून आणि तत्कालीन कायद्यानुसार झालेल्या केवळ जुन्या कोळी नोंदी शोधून मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीची प्रकरणे अवैध करण्याचा सपाटा  जात पडताळणी समितीकडून सुरू असुन सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरुद्ध   या जमातीत प्रचंड रोष निर्माण झाला असून  या दोन्ही जमातीच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथील अनु जमाती प्रमाणपत्र तपासणी   ( क्र.1) समितीस 10 ऑगस्ट रोजी प्रतिकात्मक टाळेठोक आंदोलन करण्याचा निर्धार परभणी आणि बीड जिल्ह्यातील महादेव कोळी समाज बांधवांच्या बैठकीत करण्यात आला. 

अनुसूचित जमाती अंतर्गत क्रमांक 29 वर कोळी महादेव आणि 30 क्रमांकावर  कोळी मल्हार  या जमाती आहेत.. ह्या दोन्ही जमातीच्या 1950 पूर्वी ब्रिटिश काळात पुर्ण महाराष्ट्रात कोळी नोंदी झालेल्या आहेत.  पुणे, ठाणे, नगर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी बांधवांना कोळी नोंदीवरून वैधता प्रमाणपत्र दिले जाते. तेथे कोळी नोंद चुकीची ठरवली जात नाही. मात्र महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचे पारंपरिक मूळ वस्तीस्थान असलेल्या मराठवाडा बालाघाटातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या बांधवांची प्रकरणे मात्र कोळी नोंदीवरून प्रकरण अवैद्य केले जाते त्यामुळे या जमातीत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.एकाच आदिवासी विकास विभागाच्या असणाऱ्या जात पडताळणी समितीकडून पुणे, ठाणे, नगर, नाशिक, रायगड जिल्ह्याला एक न्याय आणि मराठवाड्याला वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित करीत समितीने अवलंबलेल्या भेदभावाच्या निषेधार्थ समितीस टाळे ठोकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 

मे महिन्यात मराठवाड्यातील महादेव कोळी मल्हार कोळी जमातीच्या बांधवांनी 14 दिवस अन्नत्याग उपोषण  केल्यानंतरही प्रश्न  जैसे थे आहे. उपोषणाच्या स्थगिती वेळी   समितीस 60 दिवसाचा कालावधी पडताळणी समितीस देऊन टाळे ठोक करण्याचे निवेदन त्यावेळेस दिले होते 60 दिवसापेक्षा कालावधी जास्त उलटल्याने 10ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील  महादेव कोळी मल्हार कोळी समाज बांधवांच्या वतीने समितीस टाळे ठोकण्याचा  निर्धार व्यक्त करण्यात आला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे. 

ह्या बैठकीलागणेश राव सूर्यवंशी, अच्युतराव सोगे, किशोर भाऊ सूर्यवंशी, रोहिदास एम्बलवाड, शंकर गंगाधरे, विश्वंभर मेकेवाड,गोविंद सोलेवाड, विठ्ठल बुधवारे, बंडू सौंदडे, राम चिंचलवाड, तुकाराम सोळंके नागनाथ पोतलवाड,  रामभाऊ वाघमारे,ॲड राजू पिटले, कोंडीबा भंगे, रंगनाथ मामीलवाड यांच्यासह महादेव कोळी जमातीचे कार्यकर्ते उपस्थित होते..

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90