header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

नीट-टेट पेपरफुटीविरोधात उरणमध्ये २० जुलै रोजी एल्गार!

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या व्यवस्थेविरोधात DYFI-SFI चे तीव्र आंदोलन.

दै हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी 

उरण रायगड 

देशभरात वारंवार होत असलेल्या नीट (NEET) व टेट (TET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या गंभीर खेळाविरोधात डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI), उरण यांच्या वतीने  सोमवार (दि. २० जुलै) सकाळी ११.०० वाजता गांधी चौक, उरण येथे जाहीर आंदोलन करण्यात येणार आहे.

DYFI-SFI ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केंद्र व राज्य सरकारच्या परीक्षा व्यवस्थेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करत, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असल्याचा आरोप केला आहे. प्रामाणिकपणे वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

संघटनांनी म्हटले आहे की, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. पेपरफुटी ही आता अपवाद नसून व्यवस्थेतील गंभीर अपयशाचे प्रतीक बनली आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसारख्या दुर्दैवी घटनाही या व्यवस्थेच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित करतात, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आंदोलनाद्वारे संघटनांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी, दोषींना कठोर शिक्षा, एनटीए बरखास्त करणे, प्रभावित विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, टेट परीक्षा पारदर्शक पद्धतीने पुन्हा घेणे आणि परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा यांसह विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत.

DYFI-SFI ने उरण तालुक्यातील विद्यार्थी, पालक, युवक आणि नागरिकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “पेपरफुटी थांबवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा” हा आंदोलनाचा प्रमुख संदेश असून, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

उद्या (२० जुलै) सकाळी ११.०० वाजता गांधी चौक, उरण येथे होणाऱ्या या आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, प्रशासन या आंदोलनाची कितपत गंभीर दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90