header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

बातमीचा इम्पॅक्ट! जिल्हा परिषदेतून महापुरुषांच्या प्रतिमा हटवल्या; परिसरही स्वच्छ

हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : हिंदू प्रकाशवार्ताने जिल्हा परिषद परिसरात राजर्षी शाहू महाराज व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा कचऱ्यात पडल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. संबंधित ठिकाणावरील कचरा हटविण्यात आला असून महापुरुषांच्या प्रतिमा सन्मानपूर्वक तेथून हलविण्यात आल्या. तसेच संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयालगत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई करून परिसर स्वच्छ केला. या घटनेमुळे महापुरुषांच्या प्रतिमांबाबत अधिक संवेदनशीलता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधित विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90