सदर समाधान शिबिर मंत्री अदिती ताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
विश्वास गायकवाड बोरघर, माणगांव
बुधवार दिनांक २२ जुलै २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील तालुका माणगांव येथील गांधी हॉल मध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात संपन्न २,७४८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ, अनाथ लाभांतर्गत पोलीस शिपाई पदी निवड झालेल्या युवकाचा विशेष सन्मान
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार, जनतेच्या दारी कल्याणकारी योजनांचा लाभ थेट पोहोचवण्यासाठी आज दिनांक २२ जुलै, २०२६ रोजी माणगांव येथील ज. गांधी मेमोरिअल सभागृहात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अत्यंत उत्साहात पार पडले. मा. मुख्यमंत्री महोदयांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात श्रीवर्धन, माणगांव, म्हसळा, तळा व रोहा या तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर भव्य शासकीय कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री, मा. ना. कु. आदितीताई तटकरे ह्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच मा. श्री. प्रशांत शिंदे, संपर्क प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान, १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हे उपस्थित होते. मा. मुख्यमंत्री महोदयांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनाथ लाभार्थीचा सत्कार :
सदर शिबिरामध्ये एकूण २,७४८ नागरिकांना निरनिराळ्या योजनांचा लाभ मंजूर करण्यात आला, ज्यातील १०६ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर मान्यवरांच्या हस्ते लाभ सुपूर्द करण्यात आले, तसेच यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या सूचनेनुसार, समाजातील वंचित व दुर्लक्षित घटक असलेल्या अनाथ घटकाला प्राधान्याने लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या अनुषंगाने तालुक्यातील ढालघर येथील रहिवासी श्री. ओंकार अनिल शिंदे या युवकास माणगांव प्रशासनाने तत्परतेने अनाथ प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. या प्रमाणपत्राच्या आधारे अनाथ समांतर आरक्षणांतर्गत ओंकार शिंदे यांची मुंबई पोलीस विभागात पोलीस शिपाई पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल मा. मंत्री ना. कु. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते शिबिरात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विविध शासकीय विभागांमार्फत वितरीत करण्यात आलेल्या लाभ माहिती खालीलप्रमाणे-
१. महसूल विभाग :
महसूल विभागामार्फत सर्वाधिक नागरिकांना विविध दाखले व योजनांचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये १,५८८ नागरिकांना जात प्रमाणपत्र, डोमेसाईल, उत्पन्न दाखले, ई. प्रमाणपत्र, ३९७ शेतकऱ्यांना जिवंत ७/१२ मोहिमेतंर्गत सुधारित ७/१२, ६७ शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक कार्ड, ६१ लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचे मंजुरी आदेश, ५३ कुटुंबांना नवीन रेशन कार्ड, २७ नागरिकांना जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकृत आदेश, ३ महिलांना जमिनीवर हक्क मिळवून देत लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ, देण्यात आले आहे.
२. पंचायत समिती व शिक्षण विभागः
स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ११ महिला बचत गटांना वैयक्तिक व्यवसायासाठी आर्थिक अनुदान देण्यात आले तसेच शिक्षण विभागामार्फत ११ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व ३७ लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा वाटप करणेत आले आहे.३. तालुका आरोग्य विभाग :
आरोग्य सेवेचा विस्तार करण्यासाठी २२१ नागरिकांना आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
४. नगरपंचायत विभाग माणगांव
शहरी भागातील बेघर व गरजू नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअर्तंगत ६२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी दिली तसचे शबरी आदिवासी घरकुल योजनेअर्तंगत ३५ आदिवासी कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला.
५. एस.टी. महामंडळ माणगांव आगार :
प्रवाशांच्या सुविधेसाठी एस.टी. महामंडळाकडून ४८ नागरिकांना N.C.M.C. स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
६. तालुका कृषी विभाग :
कृषी विभागामार्फत ४६ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व इतर कृषी योजनांचे लाभ देण्यात आले.
७. भूमि अभिलेख कार्यालय :
जमिनींच्या मोजणीशी संबंधित ४७ नागरिकांना मोजणीची सनद सुपूर्द करण्यात आली.
८. एकात्मिक बाल विकास प्रकल्प :
महिला व बाल कल्याणासाठी विविध उपक्रम राबवून लेक लाडकी व प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत २५ माता व बालकांना योजनेचा लाभ देण्यात आला, ५ लाभार्थ्यांना पूर्व शालेय कीट्स वाटप, ३ नवजात बालकांच्या मातांना बेबी केअर किट सुपूर्द करण्यात आले.
शासकीय योजनांचा लाभ थेट आणि जलद गतीने तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश असून, आजच्या या भव्य शिबिरास श्रीवर्धन मतदारसंघातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.