header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

डॉ. निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू डॉ.व्यंकटेशडुबेवार सह दोघांवरगुन्हा दाखल .

न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई. शहरातील पांडुरंग हॉस्पिटल मधील घटना. 

हिंदू प्रकाश वार्ता/अशोक पवार 

परभणी**पीडित महिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असताना त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी परभणी शहरातील पांडुरंग हॉस्पिटल मधील तीन नामांकित डॉक्टर विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार या प्रकरणी डॉव्यंकटेश डुबेवार डॉ. व्यंकटेश हराळे डॉ. सागर चेउलवारयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे करत आहेत फिर्यादी भाऊसाहेब पंडित झोल यांच्या तक्रारीनुसार त्यांची आई निलावतीबाई पांडुरंग झोल यांच्या छातीत दुखत असल्याने 7 मार्च 2023 रोजी त्यांना पांडुरंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते या मध्ये ईसीजी आणि टू डी इको तपासणीनंतर एन्जिओग्राफी करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरने सांगितले व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार केले जातील आणि रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे भरावे लागणार नाहीत असे सांगण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे मात्र या योजना मंजूर होईपर्यंत 60000 रुपये भरण्यास सांगून ही रक्कम घेतल्याची तक्रारीत नमूद केली आहे एन्जिओग्राफीमध्ये रक्तवाहिनीतील ब्लॉकेज काढल्यानंतर एन्जिओप्लास्टीकरण्यास सुरुवात करण्यात आली सुरुवातीला डाव्या हाताच्या जमिनीतून प्रक्रिया करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो यशस्वी न झाल्याची माहिती आपल्याला देण्यात आली असा आरोप फिर्यादीने केला त्यानंतर उजव्या मांडीच्या धमनीतून ही प्रक्रिया करण्यात आली स्टेटबसवण्याच्या दरम्यान प्रयत्न दरम्यान रक्तस्त्राव थांबला नाही आणि आईची प्रकृती बिघडून गंभीर झाली व तिचा त्यातच मृत्यू झाला असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे आवश्यक तज्ञाची मदत न घेताच उपचार केल्यामुळे आईच्या मूर्ती झाल्याचा आरोप ही डॉक्टर ठेवण्यात आला आहे या घटनेनंतर उपचाराच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले असता सुरुवातीला रिकामी सीडी देण्यात आली आणि त्यानंतर संबंधित दिवसाऐवजी दुसऱ्या दिवसाचे फुटेज देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे तसेच या प्रकरणात न्यायालयात पुरवली असल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्याने चुकीची माहिती देऊन आपली फसवणूक केल्याचा असल्याचे तक्रार म्हटले आहे याप्रकरणी फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदरील प्रकरणात डॉक्टर अशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नसल्यामुळे नवा मुंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा लागला यामध्ये पोलीस सहाय्यक निरीक्षक खंदारे हे अधिक तपास करत आहेत.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90